मुंबई स्पिरिट…! मुंगी घुसायलाही जागा नसताना रुग्णवाहिकेला दिली अशी मोकळी वाट करून Watch Video

| Updated on: Jul 04, 2024 | 8:13 PM

टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेत टीम इंडियाने जेतेपदावर नाव कोरलं. अंतिम सामन्यात दक्षिण अफ्रिकेचा पराभव केला आणि जेतेपद मिळवलं. 17 वर्षानंतर कोट्यवधी भारतीयांचं स्वप्न पूर्ण झालं. 2007 साली जशी जंगी मिरवणूक निघाली होती. तशीच मिरवणूक यावेळीही निघाली. या आनंदोत्सवात मुंबईकरांच्या जिवंतपणाचं दर्शन घडलं. काय झालं तुम्हीच पाहा.

मुंबई स्पिरिट...! मुंगी घुसायलाही जागा नसताना रुग्णवाहिकेला दिली अशी मोकळी वाट करून Watch Video
Image Credit source: video grab
Follow us on

टीम इंडिया टी20 वर्ल्डकप जेतेपद मिळवून मुंबईत दाखल झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून क्रीडाप्रेमी आपल्या लाडक्या टीम इंडियाची वाट पाहात होते. अखेर टीम इंडियाचे विजयी शिलेदार मुंबई दाखल झाले आहेत. त्यांच्या स्वागतासाठी रस्त्याच्या दुतर्फा चाहत्यांची गर्दी पाहायला मिळाली. तासंतास टीम इंडियाची एक झलक पाहण्यासाठी चाहते उभे होते. गर्दी पांगवताना काही जणांना पोलिसांचा प्रसादही खावा लागला. असं असूनही मुंबईकरांचा जोश काही कमी झाला नाही. मुंबईकरांचं स्पिरिट काय म्हणतात ते असं आहे. सेकंदावर चालणारी ही मुंबई तितकीच संवेदनशील देखील आहे. याची अनुभूती अनेकदा आली आहे. याची अनेक उदाहरणं आतापर्यंत समोर आली आहेत. असंच उदाहरण आज विजयोत्सवात पाहायला मिळालं. मुंबईकरांना उगाचच स्पिरिट ही पदवी मिळालेली नाही. त्यामागे बरीच कारणं आहेत. आज त्याचं जिवंत उदाहरण संपूर्ण जगाला पाहता आलं. इतक्या गर्दीतही मुंबईकरांना रुग्णवाहिकेला मोकळी वाट करून दिली. ज्या गर्दीत मुंगी शिरायलाही जागा नव्हती अशा गर्दीतून चाहत्यांनी रुग्णवाहिकेला मोकळी वाट करून दिली. इतक्या गर्दितून अवघ्या काही सेकंदात रुग्णवाहिका निघून गेली.

टीम इंडियाच्या विजयी रॅली घेऊन निघालेल्या बसला जिथे काही तासांचा अवधी लागला. जस जशी रुग्णवाहीका पुढे जात होती तस तसं मोकळी वाट मिळत होती. तिथे फक्त 17 सेकंदात रुग्णवाहीका निघून गेली. हे दृश्य पाहून अनेकांनी मुंबईकरांच्या कृतीचं कौतुक केलं आहे. अनेकांनी हा व्हिडीओ देखील शेअर केला आहे. मुंबईकर कायमच सुख दुखात एकमेकांच्या साथीला उभे राहतात. एखादी मोठी आपत्ती आली की तितक्याच ताकदीने उभे राहतात. अनेकांनी या व्हिडीओखाली कमेंट्स करत मुंबईकरांची स्तुती केली आहे.

टीम इंडियाने 17 वर्षांनी टी20 वर्ल्डकप आणि 11 वर्षानंतर आयसीसी चषकावर नाव कोरलं आहे. इतकी वर्षे क्रीडारसिक या क्षणाची आतुरतेने वाट पाहात होते. अखेर रोहित शर्माच्या नेतृत्वात हे स्वप्न पूर्ण झालं आहे. भारताने दुसऱ्यांचा टी20 वर्ल्डकप जिंकला आहे. या जेतेपदानंतर रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनी निवृत्ती जाहीर केली आहे. दुसरीकडे, 2026 मध्ये टी20 वर्ल्डकप स्पर्धा भारत श्रीलंकेत संयुक्तरित्या होणार आहे.