बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात आहे. त्यानंतर बांगलादेश वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने या दौऱ्यातील 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी संघ जाहीर केला आहे. बांगलादेशचा अनुभवी फलंदाज मुशफिकुर रहीम याला दुखापतीमुळे या मालिकेला मुकावं लागलं आहे. तसेच 16 वर्षांनंतर पहिल्यांदाच शाकिब अल हसन, तमीम इकबाल आणि मुशफिकुर रहीम या अनुभवी त्रिकुटाचा बांगलादेश संघात समावेश नसण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे बांगलादेशची विंडिजविरुद्ध या मालिकेत खऱ्या अर्थाने ‘कसोटी’ लागणार आहे.
मुशफिकुर रहीमने पाकिस्तान विरूद्ध कसोटी मालिकेत उल्लेखनीय कामगिरी केली होती. त्याने पहिल्या कसोटीत 194 धावांची खेळी केली होती. मात्र त्या मालिकेनंतर मुशफिकुरला खांद्याच्या दुखापतीचा त्रास झाला. त्यानंतर मुशफिकुरला अफगाणिस्तान विरूद्धच्या मालिकेत बोटाला दुखापत झाली. त्यामुळे मुशफिकुरला या कसोटी मालिकेला मुकावं लागलं आहे. दुसऱ्या बाजूला तमीम इक्बाल वर्षभरात एकही कसोटी सामना खेळलेला नाही. तर शाकिब अल हसन याने कानपूर कसोटीनंतर मायदेशात निरोपाचा सामना खेळणार असल्याचं म्हटलं होतं. मात्र शाकिब खेळायला गेला नाही.
दरम्यान विकेटकीपर बॅट्समन लिटन दास याचं कमबॅक झालं आहे. लिटन आजारी असल्याने त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या कसोटीला मुकावं लागलं होतं. तसेच अफगाणिस्तानविरुद्धच्या 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतही स्थान देण्यात आलं नाही.
बांगलादेशला मोठा धक्का
Bangladesh will be without a key player for the upcoming #WTC25 series in West Indies 😯#WIvBANhttps://t.co/aNBzYIEpUB
— ICC (@ICC) November 10, 2024
पहिला सामना, 22 ते 26 नोव्हेंबर, एटींग्वा
दुसरा सामना, 30 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर, जमैका
विंडिज विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी बांगलादेश टीम : नजमुल हुसैन शांतो (कर्णधार), शादमान इस्लाम, महमुदुल हसन जॉय, जाकिर हसन, मोमिनुल हक, महिदुल इस्लाम अंकोन, लिटन दास (विकेटकीपर), झाकेर अली, मेहदी हसन मिराज, तैजुल इस्लाम, शोरफुल इस्लाम, तस्कीन अहमद, हसन महमूद, नाहिद राणा आणि हसन मुराद.