Hardik Pandya Divorce : ‘हा निर्णय कठीण होता…’; अखेर हार्दिक-नताशा यांच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब, दोघांची भावनिक पोस्ट व्हायरल

| Updated on: Jul 18, 2024 | 10:39 PM

Hardik Pandya Divorce : हार्दिक पंड्या नताशा स्टॅनकोविच यांच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब झालं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दोघे विभक्त होणार असल्याची चर्चा होती. अखेर आज दोघांनीही याबाबत सोशल मीडियावर पोस्ट करत जाहीर केलं आहे.

Hardik Pandya Divorce : हा निर्णय कठीण होता...; अखेर हार्दिक-नताशा यांच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब, दोघांची भावनिक पोस्ट व्हायरल
Follow us on

क्रिकेटर हार्दिक पंड्या आणि अभिनेत्री नताशा स्टॅनकोविच दोघांनीही घटस्फोट घेतल्याची घोषणा केली आहे. दोघांनीही सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबत माहिती दिलीये. लग्नाच्या चार वर्षांनंतर दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला असून दोघांना 3 वर्षांचा मुलगा असून त्याचं नाव अगस्त्य आहे. नताशा ही भारत सोडून तिच्या देशात परतलीये. नताशा आणि तिच्या मुलाचे विमानतळावरील काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले होते. नताशा आणि हार्दिक यांनी या पोस्टखालील कमेंट बॉक्स बंद केला आहे.

4 वर्षे एकत्र राहिल्यानंतर आम्ही एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. आम्ही एकत्र आमचे सर्वोत्तम प्रयत्न केले आणि आमचे सर्व काही दिले आणि आम्हाला विश्वास आहे हा निर्णय आमच्या दोघांच्या हिताचा आहे. आम्ही एकत्र घालवलेला वेळ, एकमेकांविषयी असलेला आदर आणि कुटुंब वाढवत असताना हा निर्णय घेणं आमच्यासाठी खूप कठिण असल्याचं दोघांनीही पोस्टमध्ये म्हटलं आहे.

अगस्त्यामुळे आमच्या दोघांच्या जीवनाच्या केंद्रस्थानी राहील. सहपालक म्हणून त्याच्यासाठी जे काही करता येईल ते करू. या कठिण काळात तुम्ही आम्हाला प्रायव्हसी द्याल आणि समजून घेताल यासाठी विनंती करतो, असंही दोघे पोस्टमध्ये म्हणालेत.

हार्दिक पांड्या आणि नताशा यांच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीने सांगितले होते की, दोघांमधेये वाद सुरू आहे. नताशा ही हार्दिक पांड्या याच्यावर नाराज आहे. हार्दिक पांड्याकडून मोठी चूक झालीये, असेही सातत्याने सांगितले जात होते. नेमकी दोघांमध्ये कशावरून घटस्फोट झाला याचं कोणतेही कारण अद्याप समोर आलेलं नाही.

 

आता झालेल्या टी- 20 वर्ल्ड कप वर टीम इंडियाने आपलं नाव कोरलं. या वर्ल्ड कपच्या फायनल सामन्यात हार्दिक पंड्या शेवटची ओव्हर टाकत होता. आपल्या शेवटच्या ओव्हरमध्ये टीम इंडियाला जिंकून देणाऱ्या हार्दिकच्या आयुष्यात मोठं वादळ आले आहे. इतकंच नाहीतर बीसीसीआयने आजच श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली. या टीममध्ये हार्दिक पंड्याकडे कर्णधारपद जाईल अशी चर्चा होती मात्र कर्णधारपद सोडाच त्याला उपकर्णधारपदही दिलं गेलं नाही.