श्रेयस अय्यरचा खोटेपणा पकडला गेला! ‘त्या’ माहितीनंतर बीसीसीआय अधिकाऱ्यांनी डोक्यावर मारला हात

| Updated on: Feb 22, 2024 | 3:34 PM

श्रेयस अय्यर टीम इंडियात मधल्या फळीतील दमदार फलंदाज म्हणून पाहिलं जातं. श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त असताना चौथ्या क्रमांकासाठी बरीच माथापच्ची करावी लागली होती. वनडे वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी श्रेयस अय्यरने कमबॅक केलं. पण टीम इंडियात हवी तशी कामगिरी करता आली नाही. फिटनेस आणि कामगिरीमुळे त्याला वगळण्यात आल्याची चर्चा रंगली असताना एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

श्रेयस अय्यरचा खोटेपणा पकडला गेला! त्या माहितीनंतर बीसीसीआय अधिकाऱ्यांनी डोक्यावर मारला हात
Follow us on

मुंबई : श्रेयस अय्यर इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यात खेळला होता. त्यानंतर उर्वरित तीन कसोटी सामन्यातून त्याला वगळण्यात आलं. त्याच्या अनुपस्थितीत तिसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने दमदार कामगिरी केली आहे. तसेच तिसऱ्या कसोटी सामन्यात विजय मिळवून मालिकेत 2-1 ने आघाडी मिळवली आहे. दरम्यान टीम इंडियात खेळत नसलेले वरिष्ठ खेळाडू वारंवार बीसीसीआयच्या आदेशांना केराची टोपली दाखवत असल्याचं दिसत आहे. इशान किशननंतर यात आता आणखी एक नाव समोर आलं आहे. कारण श्रेयस अय्यरच्या एका रिपोर्टमुळे त्याचं पितळ उघडं पडलं आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात झालेल्या पाठदुखीच्या त्रासामुळे श्रेयस अय्यरला पुढच्या मालिकेतून वगळण्यात आल्याचं सांगण्यात येत होतं. या व्यतिरिक्त श्रेयर अय्यरला सूरही गवसत नसल्याचं समोर आलं होतं. दुसरीकडे, निवड समितीने त्याला रणजी ट्रॉफी खेळून वर्कलोड मॅनेज करण्यास सांगितलं होतं. आता एका रिपोर्टमुळे बीसीसीआयच्या डोळ्यात धूळफेक केल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

श्रेयसने मुंबईच्या रणजी संघ निवडकर्त्यांना काय सांगितलं?

रणजी ट्रॉफीमध्ये श्रेयस अय्यर मुंबईसाठी ग्रुप स्टेजच्या शेवटच्या सामन्यात खेळेल अशी चर्चा होती. पण त्यातून माघार घेतली. आता क्वार्टर फायनल खेळण्यासही नकार दिला आहे. पाठदुखीच्या त्रासामुळे खेळत नसल्याची माहिती श्रेयस अय्यरने मुंबईच्या सेलेक्टर्संना दिली होती. आता या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, नॅशनल क्रिकेट अकादमीने निवड समितीला सांगितलं की, अय्यरला कोणतीही दुखापत नाही आणि तो पूर्णपणे फिट आहे. एनसीएमध्ये स्पोर्ट्स सायन्स डिविजनचे प्रमुख आणि टीम इंडियाचे माजी हेड फिजियो नितीन पटेल यांनी ईमेलद्वारे ही माहिती बीसीसीआयला दिली आहे.

नितीन पटेल यांचा ईमेल श्रेयस अय्यरने रणजी खेळण्यास नकार दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी आला आहे. या मेलमध्ये नितीन पटेल यांनी स्पष्ट लिहिलं आहे की, दुसऱ्या कसोटी सामन्यानंतर फिटनेस रिपोर्टमध्ये श्रेयस अय्यर फिट होता आणि निवडीसाठी उपलब्ध होता. टीम इंडियातून बाहेर केल्यानंतरही श्रेयस अय्यरला कोणतीही दुखापत झालेली नाही.

या माहितीनंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. रणजी खेळायची नसल्याने श्रेयसने खोटं बोललं असल्याची चर्चा क्रीडाप्रेमी करत आहेत. कारण त्याने दुखापतीबाबत एनसीएला कोणतीही माहिती दिली नाही. कारण सेंट्रल काँट्रॅक्ट आणि टीम इंडियाकडू खेळत असलेल्या खेळाडूंना ही माहिती देणं अनिवार्य आहे. असं असताना खेळाडू आयपीएलला प्राधान्य देण्यासाठी वारंवार खोटं तर बोलत नाही ना असा प्रश्नही उपस्थित होत आहे.