एका बाजूला रोहित शर्मा याच्या नेतृत्वात टीम इंडिया न्यूझीलंड विरुद्ध पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये कसोटी मालिकेतील दुसरा आणि निर्णायक सामना खेळत आहे. तर दुसऱ्या बाजूला वूमन्स इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेचा आजपासून थरार रंगतोय. विश्व विजेता न्यूझीलंड या भारत दौऱ्यात एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी सज्ज आहे. तर वूमन्स टीम इंडिया वर्ल्ड कपमधील साखळी फेरीतूनच बाहेर पडल्यानंतर या मालिकेतून परत एक चांगली सुरुवात करण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र त्याआधी टीम इंडियाला मोठा झटका लागला आहे. टीम इंडिया नियमित कर्णधार हरमनप्रीत कौर हीला त्रासामुळे पहिल्या सामन्याला मुकावं लागलं आहे.
टीम इंडियाने या पहिल्या सामन्यात नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. हरमनप्रीत कौर हीच्या अनुपस्थितीत सांगलीकर स्मृती मंधाना भारतीय संघाचं नेतृत्व करत आहे. बीसीसीआयने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे. त्यामुळे स्मृतीसमोर आपल्या नेतृत्वात टीम इंडियाला विजयी सलामी मिळवून देण्याचं आव्हान असणार आहे. आता महिला ब्रिगेड सलामीच्या सामन्यात कशी कामगिरी करते? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.
दरम्यान नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणाऱ्या या सामन्यातून दोघींनी पदार्पण केलं आहे. तेजल हसबनीस आणि सायमा ठाकोर या दोघींचं पदार्पण झालं आहे. जेमिमाह रॉड्रिग्स हीने या दोघींना कॅप देऊन संघात स्वागत केलं आणि वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
हरमनप्रीत कौर ‘आऊट’
Note – Ms Harmanpreet Kaur has a niggle and has been rested for the 1st ODI. Smriti Mandhana will be leading the side in her absence.#INDvNZ @IDFCFIRSTBank
— BCCI Women (@BCCIWomen) October 24, 2024
न्यूझीलंड वूमन्स प्लेइंग ईलेव्हन : सोफी डेव्हाईन (कर्णधार), सुझी बेट्स, जॉर्जिया प्लिमर, अमेलिया केर, ब्रुक हॅलिडे, मॅडी ग्रीन, इसाबेला गेज (विकेटकीपर), लॉरेन डाउन, जेस केर, मॉली पेनफोल्ड आणि ईडन कार्सन.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : स्मृती मंधाना (कर्णधार), शफाली वर्मा, यस्तिका भाटिया (यष्टीकीपर), दयालन हेमलता, जेमिमाह रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, तेजल हसबनीस, राधा यादव, अरुंधती रेड्डी, सायमा ठाकोर आणि रेणुका ठाकूर सिंग.