NED vs AFG Live Streaming | नेदरलँड्स विरुद्ध अफगाणिस्तान रंगतदार सामना, मॅच कधी आणि कुठे पाहता येणार?

| Updated on: Nov 03, 2023 | 12:18 AM

Netherlands vs Afghanistan Live Streaming | अफगाणिस्तानकडे नेदरलँड्स विरुद्धचा सामना जिंकून सेमी फायनलमधील आव्हान कायम ठेवण्याची संधी आहे. मात्र नेदरलँड्सही अफगाणिस्तानला काय सहजासहजी जिंकून देणार नाही. त्यामुळे या सामन्यात चांगलीच चुरस पाहायला मिळणार आहे.

NED vs AFG Live Streaming | नेदरलँड्स विरुद्ध अफगाणिस्तान रंगतदार सामना, मॅच कधी आणि कुठे पाहता येणार?
Follow us on

लखनऊ | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधील 34 व्या सामन्यात नेदरलँड्स विरुद्ध अफगाणिस्तान आमनेसामने असणार आहेत. नेदरलँड्स आणि अफगाणिस्तान इतर 8 संघांच्या तुलनेत अनुभवाने नवखे संघ आहेत. त्यामुळे दोन्ही संघांना लिंबुटिंबू म्हणून गणलं जातं. मात्र या दोन्ही संघांनी आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये आतापर्यंत उलटफेर केले आहेत. नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिकाला पराभूत केलं. आतापर्यंत दक्षिण आफ्रिकाला या वर्ल्ड कपमध्ये पराभूत करण्यात फक्त नेदरलँड्सलाच यश आलंय. शिवाय नेदरलँड्सने बांगलादेशलाही पराभूत केलंय. तर दुसऱ्या बाजूला अफगाणिस्तानने इंग्लंड, पाकिस्तान आणि श्रीलंकाला चितपट केलंय. या दोन्ही संघांनी आतापर्यंत एकूण 5 उलटफेर केले आहेत.

दोन्ही संघांनी आतापर्यंत काही सामन्यांचा अपवाद वगळता सामना एकतर्फी होऊ दिलेला नाही. त्यामुळे नेदरलँड्स विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात होणारा सामना हा चांगलाच रंगतदार होणार हे निश्चितच आहे. अफगाणिस्तानसाठी हा सामना सेमी फायनलच्या हिशोबाने अत्यंत महत्त्वाचा आहे. तर दुसऱ्या बाजूला नेदरलँड्ससाठी सेमी फायनलच्या हिशोबाने तसं काहीच नाही. मात्र नेदरलँड्सचा पॉइंट्स टेबलमध्ये टॉप 7 मध्ये राहून 2025 मध्ये होणाऱ्या आयसीसी चॅम्पियन ट्रॉफीसाठी क्वालिफाय करण्याचा प्रयत्न निश्चितच असेल. दरम्यान नेदरलँड्स विरुद्ध अफगाणिस्तान या सामन्याबाबत आपण जाणून घेऊयात.

नेदरलँड्स विरुद्ध अफगाणिस्तान सामना केव्हा?

नेदरलँड्स विरुद्ध अफगाणिस्तान सामना शुक्रवारी 3 नोव्हेंबर रोजी खेळवण्यात येणार आहे.

नेदरलँड्स विरुद्ध अफगाणिस्तान सामना कुठे?

नेदरलँड्स विरुद्ध अफगाणिस्तान सामन्याचं आयोजन हे लखनऊमधील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी एकाना स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे.

नेदरलँड्स विरुद्ध अफगाणिस्तान सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

नेदरलँड्स विरुद्ध अफगाणिस्तान सामन्याला दुपारी 2 वाजता सुरुवात होईल. तर 1 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.

नेदरलँड्स विरुद्ध अफगाणिस्तान सामना टीव्हीवर कुठे पाहता येईल?

नेदरलँड्स विरुद्ध अफगाणिस्तान सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.

नेदरलँड्स विरुद्ध अफगाणिस्तान सामना मोबाईलवर फुकटात कुठे बघता येईल?

नेदरलँड्स विरुद्ध अफगाणिस्तान सामना मोबाईलवर फुकटात डिज्नी प्लस हॉटस्टार एपवर पाहायला मिळेल.

अफगाणिस्तान टीम | हशमतुल्ला शाहिदी (कॅप्टन), रहमानउल्लाह गुरबाज, इब्राहिम झद्रान, रियाझ हसन, रहमत शाह, नजीबुल्ला झद्रान, मोहम्मद नबी, इक्रम अलीखिल, अजमतुल्ला उमरझाई, रशीद खान, मुजीब उर रहमान, नूर अहमद, फजलहक फारुकी, अब्दुल रहमान आणि नवीन उल हक.

नेदरलँड्स क्रिकेट टीम | स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार), मॅक्स ओ’डॉड, बास डी लीडे, विक्रम सिंग, तेजा निदामानुरु, पॉल व्हॅन मीकेरेन, कॉलिन अकरमन, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, लोगन व्हॅन बीक, आर्यन दत्त, रायन क्लेन, वेस्ली बॅरेसी, साकिब झुल्फिकार, शरीझ अहमद आणि सायब्रँड एंजेलब्रेक्ट.