लखनऊ | नेदलँड्स क्रिकेट टीमने दक्षिण आफ्रिका टीमवर विजय मिळवला होता. नेदरलँड्सने 43 ओव्हरच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकावर 38 धावांनी मात करत उलटफेर केला होता. नेदरलँड्सने विजयासाठी दिलेल्या 246 धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा बाजार 42.5 ओव्हरमध्ये 207 धावांवर आटोपला. नेदरलँड्सने यासह विजयाचं खातं उघडलं. आता नेदरलँड्सचा वर्ल्ड कपमधील चौथा सामना हा श्रीलंका विरुद्ध होणार आहे. श्रीलंकेचा वर्ल्ड कपमधील तिन्ही सामन्यात पराभव झाला. त्यामुळे शनिवारी होणाऱ्या सामन्यात नेदरलँड्स पुन्हा उलटफेर करते की श्रीलंका विजयाचं खातं उघडते याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे. या सामन्याबाबत आपण जाणून घेऊयात.
नेदरलँड्स विरुद्ध श्रीलंका सामना शनिवारी 21 ऑक्टोबर रोजी खेळवण्यात येणार आहे.
नेदरलँड्स विरुद्ध श्रीलंका सामन्याचं आयोजन हे लखनऊमधील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी एकाना स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे.
नेदरलँड्स विरुद्ध श्रीलंका सामन्याला सकाळी 10 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 10 वाजता टॉस होईल.
नेदरलँड्स विरुद्ध श्रीलंका सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येईल.
नेदरलँड्स विरुद्ध श्रीलंका सामना फुकटात मोबाईलवर डिज्नी प्लस हॉटस्टारवर पाहता येईल.
नेदरलँड्स विरुद्ध श्रीलंका आमनेसामने
Back in action tomorrow, this time against a familiar opponent. 🇳🇱💪#CWC23 pic.twitter.com/B66r9qS8gO
— Cricket🏏Netherlands (@KNCBcricket) October 20, 2023
नेदरलँड्स क्रिकेट टीम | स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार), मॅक्स ओ’डॉड, बास डी लीडे, विक्रम सिंग, तेजा निदामानुरु, पॉल व्हॅन मीकेरेन, कॉलिन अकरमन, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, लोगन व्हॅन बीक, आर्यन दत्त, रायन क्लेन, वेस्ली बॅरेसी, साकिब झुल्फिकार, शरीझ अहमद आणि सायब्रँड एंजेलब्रेक्ट.
श्रीलंका क्रिकेट टीम | कुसल मेंडिस (कॅप्टन), चमिका करुणारत्ने, कुसल परेरा, पथुम निसांका, लाहिरू कुमारा, दिमुथ करुणारत्ने, सदीरा समरविक्रमा, चारिथ असालंका, धनंजया डी सिल्वा, महेश तीक्षणा, दुनिथ वेललागे, कसून राजिथा, दुनिथ वेललागे, कासुन राजिथा, मथीशा पथिराणा, दिलशान मधुशंका आणि दुशन हेमंथा.