लखनऊ | श्रीलंका क्रिकेट टीमने अखेर रडत रडत नेदरलँड्ससमोर विजयाचं खातं उघडलं आहे. श्रीलंकेने सलग 3 सामने गमावल्यानंतर चौथ्या मॅचमध्ये विजय मिळवला आहे. नेदरलँड्सने श्रीलंकेला विजयासाठी 263 धावांचं आव्हान दिलं होतं. नेदरलँड्सने सहजासहजी हार मानली नाही. नेदरलँड्सने अखेरपर्यंत लढत देत श्रीलंकेला झुंजवलं. मात्र श्रीलंकेने 5 विकेट्स गमावून 263 धावांचं आव्हान हे 10 बॉलआधी पूर्ण केलं. सदीरा समरविक्रमा हा श्रीलंकेच्या विजयाचा हिरो ठरला. सदीराने नाबाद 91 धावांची खेळी केली.
ओपनर पाथुम निसांका याने 54 धावांची अर्धशतकी खेळी केली. कुसल परेरा 5 धावा करुन तंबूत परतला. कॅप्टन कुसल मेंडीस स्वसतात 11 धावांवर परतला. चरिथ असलंका याने 44 धावांची खेळी केली. तर धनंजया डी सिल्वा याने 30 धावांचं योगदान दिलं. तर सदीरा समरविक्रमा आणि दुशानन हेमंथा या जोडीने श्रीलंकेला विजयापर्यंत पोहचवलं. सदीरा समरविक्रमा याने 107 बॉलमध्ये 7 चौकारांच्या मदतीने नॉट आऊट 91 रन्स केल्या. तर दुशानने नाबाद 4 धावांचं योगदान दिलं. नेदरलँड्सकडून आर्यन दत्त याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर पॉल व्हॅन मीकरेन आणि कॉलिन अकरमन या एकरमन या दोघांनी 1-1 विकेट घेतली.
त्याआधी नेदरलँड्सकडून लोगान वॅन बीक आणि सायब्रँड एंजेलब्रेक्ट या दोघांनी सातव्या विकेटसाठी 130 धावांची विक्रमी भागीदारी केली. या भागीदारीच्या जोरावर नेदरलँड्सने 49.4 ओव्हरमध्ये ऑलआऊट 262 धावा केल्या. सायब्रँड एंजेलब्रेक्ट याने सर्वाधिक 70 धावा केल्या. तर लोगान वॅन बीकने 59 धावांचं योगदान दिलं. तर इतरांना विशेष काही करता आलं नाही. दिलशान मधुशंका आणि कसुन राजिथा या दोघांनी प्रत्येकी 4-4 विकेट्स घेतल्या. तर महीश तीक्षणा याने 1 विकेट घेतली.
नेदरलँड्स प्लेईंग ईलेव्हन | स्कॉट एडवर्ड्स (कॅप्टन आणि विकेटकीपर), विक्रमजीत सिंग, मॅक्स ओडोड, कॉलिन अकरमन, बास डी लीडे, सायब्रँड एंजेलब्रेक्ट, तेजा निदामानुरु, लोगन व्हॅन बीक, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, आर्यन दत्त, पॉल व्हॅन मीकरेन
श्रीलंका प्लेईंग ईलेव्हन | कुसल मेंडीस (कॅप्टन आणि विकेटकीपर) पथुम निसांका, कुसल परेरा, कुसल मेंडिस, सदीरा समरविक्रमा, चरित असलंका, धनंजया डी सिल्वा, दुशान हेमंथा, चमिका करुणारत्ने, महेश तीक्षना, कसून रजिथा आणि दिलशान मधुशंका.