मुंबई : भारताला ऑलिम्प्किमध्ये सुवर्णपदक जिंकून देणारा गोल्डन बॉय नीरज चोप्रा सर्वांना माहितच आहे. नीरज चोप्राने देशासाठी मिळवून दिलेल्या यशाने आपल्या नावावर इतिहास केला आहे. देशातील प्रत्येक क्षेत्रातील दिग्गज त्याचे चाहते आहेत. नीरजने आपली एक ओळख निर्माण केली आहे. अशातच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये त्याने सांगितलं आहे की त्याला भारतीय महिला संघातील कोणती क्रिकेटपटू आवडते.
नाीरज चोप्रा महिला प्रीमियर लीगचा एलिमिनेटर सामना पाहण्यासाठी आला होता. यावेळी त्याने आवडत्या खेळाडूंची नावं सांगितली. याबाबतचा व्हिडीओ हा महिला प्रीमियर लीगच्या ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आला आहे. ऑलिम्पिकमध्ये महिला आणि पुरुष दोघेही भाग घेतात आणि क्रिकेटमध्येही महिलांना समान पाठिंबा मिळत असल्याचे पाहून मला आनंद होत असल्याचं नीरज म्हणाला. नीरजला महिला क्रिकेटरमध्ये आवडणारी खेळाडू कोणती असं विचारल्यावर त्याने तीन खेळाडूंची नावं घेतलीत.
Off the field with Neeraj Chopra – India’s Olympic Gold-medallist! #TATAWPL excitement ?
Favourite cricketers ?
Insight on some of his social media posts ?Here’s @Neeraj_chopra1 unplugged ? ? pic.twitter.com/GVMWhplUcN
— Women’s Premier League (WPL) (@wplt20) March 25, 2023
भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर त्यासोबतच स्मृती मंधाना यांचा खेळ आवडत असल्याचं नीरज म्हणाला. तिसरं नाव त्याने घेतलं ते म्हणजे लेडी सेहवागचं. नीरजने सांगितलं ती तो शफालीला दक्षिण आफ्रिकेमध्ये भेटला होता आणि तो सामनाही त्याने स्टेडिअममध्ये पाहिला होता.
वूमन्स अंडर 19 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये भारतीय संघाने धडक मारली होती. त्यावेळी अंतिम सामन्याअगोदर नीरज चोप्रा दक्षिण आफ्रिकेत पोहोचला होता. भारताचं संघाचा त्याने आत्मविश्वास वाढवला होता आणि सामन्यानंतर तुम्ही सेलिब्रिटी सारखे व्हाल पण ती हवा डोक्यात न जावू देता मेहनत करत रहा, असा सल्ला त्याने दिला होता.