पल्लेकेले | कॅप्टन रोहित शर्मा आणि शुबमन गिल या सलामी जोडीने केलेल्या धमाक्याच्या जोरावर टीम इंडियाने आशिया कप 2023 मध्ये विजयाचं खातं उघडलंय. टीम इंडियाने नेपाळ विरुद्धच्या सामन्यात 10 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला आहे. टीम इंडियाने यासह सुपर 4 मध्ये धडक दिली आहे. टीम इंडियाचा सुपर 4 मधील पुढील सामना हा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना पुन्हा एकदा थरारक सामना पाहायला मिळणार आहे. तर दुसऱ्या बाजूला नेपाळचं पराभवामुळे आशिया कपमधील आव्हान संपुष्टात आलं आहे.
पावसामुळे टीम इंडियाला डीएसएसनुसार 23 ओव्हरमध्ये 145 धावांचं सुधारित आव्हान मिळालं. रोहित आणि शुबमन या सलामी जोडीनेच हे आव्हान 20.1 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. या जोडीने नाबाद 147 धावांची भागीदारी केली. रोहित शर्मा याने 59 बॉलमध्ये 5 सिक्स आणि 4 चौकारांच्या मदतीने नाबाद 74 धावा केल्या. तर शुबमन गिल याने 62 बॉलमध्ये 8 फोर आणि 1 सिक्सच्या मदतीने नॉट आऊट 67 रन्स केल्या. नेपाळकडून कुणालाही एकही विकेट घेता आली नाही.
नेपाळने 48.2 ओव्हरमध्ये ऑलआऊट 230 धावा केल्या. त्यामुळे टीम इंडियाला विजयासाठी 231 धावांचं आव्हान मिळालं. टीम इंडियाकडून रोहित शर्मा आणि शुबमन ही सलामी जोडी मैदानात आली. या दोघांनी 2.1 ओव्हरमध्ये बिनबाद 17 धावा केल्या. त्यानंतर पावसाची एन्ट्री झाली. पावसामुळे जवळपास 60-80 मिनिटांचा खेळ वाया गेला. त्यानंतर 10 वाजता पंचांनी पाहणी केली.
टीम इंडियाची सुपर 4 मध्ये एन्ट्री
A clinical performance with the bat from #TeamIndia! 👌 👌
Captain Rohit Sharma & Shubman Gill scored cracking unbeaten fifties to seal India’s 1⃣0⃣-wicket win (via DLS) over Nepal 🙌 🙌
Scorecard ▶️ https://t.co/i1KYESEMV1 #AsiaCup2023 | #INDvNEP pic.twitter.com/iOEwQQ26DW
— BCCI (@BCCI) September 4, 2023
त्यानंतर 10 वाजून 30 मिनिटांनी खेळाला सुरुवात झाली. पावसामुळे अनेक षटकांचा खेळ वाया गेला. त्यामुळे टीम इंडियाला विजयासाठी डकवर्थ लुईस नियमांनुसार 23 ओव्हरमध्ये सुधारित 145 धावांचं आव्हान मिळालं. टीम इंडियाने हे आव्हान एकही विकेट न गमावता पूर्ण केलं.
टीम इंडिया प्लेईंग इलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.
नेपाळ क्रिकेट टीम प्लेइंग इलेव्हन | रोहित पौडेल (कॅप्टन), कुशल भुर्तेल, आसिफ शेख (विकेटकीपर), भीम शार्की, सोमपाल कामी, गुलशन झा, दीपेंद्र सिंग आयरी, कुशल मल्ला, संदीप लामिछाने, करण केसी आणि ललित राजबंशी.