वूमन्स आशिया कप 2024 स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात नेपाळ क्रिकेट टीमने इतिहास रचला आहे. स्पर्धेतील पहिल्या सामन्यात ए ग्रुपमधील यूएई विरुद्ध नेपाळ आमसामने होते. नेपाळने हा सामना 23 बॉलआधी 4 विकेट्स गमावून हा सामना जिंकला आणि विजयी सलामी दिली. यूएईने नेपाळला विजयासाठी 116 धावांचं आव्हान दिलं होतं. नेपाळने हे विजयी आव्हान 16.1 ओव्हरमध्ये 4 विकेट्स पूर्ण केलं. नेपाळने 118 धावा केल्या. नेपाळने यासह या स्पर्धेच्या इतिहासातील पहिलावहिला विजय मिळवला.
नेपाळने टॉस जिंकून यूएईला बॅटिंगसाठी भाग पाडलं. मात्र नेपाळसमोर यूएईला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. यूएईने 50 धावांच्या आतच 4 विकेट्स गमावल्या. त्यानंतर यूएईचा स्कअर 78 असताना कविशा एगोडागे 22 धावांवर आऊट झाली. खुशी शर्मा हीने यूएईकडून सर्वाधिक धावा केल्या. खुशीने 2 चौकारांच्या मदतीने 39 बॉलमध्ये 36 धावा केल्या. त्यामुळे यूएईला 100 पार मजल मारता आली. मात्र इतर खेळाडूंनी खास काही केलं नाही. त्यामुळे यूएईला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. नेपाळकडून कॅप्टन इंदू बर्मा हीने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.
नेपाळचे टॉप ऑर्डरमधील फलंदाज विजयी धावंचा पाठलाग करताना झटपट आऊट झाले. तिघींनी दुहेरी आकडा गाठता आला नाही. मात्र समझना खडका हीने एक बाजू लावून धरली. खडकाने 45 बॉलमध्ये 11 चौकारांच्या मदतीने नाबाद 72 धावांची खेळी करत नेपाळच्या विजयात मोठी भूमिका बजावली. समझना खडका हीने यासह मोठा विक्रम आपल्या नावे केला. समझना खडका ही वूमन्स आशिया कप स्पर्धेत नेपाळकडून सर्वोच्च वैयक्तिक धावा करणारी फलंदाज ठरली.
दरम्यान नेपाळ वूमन्स आशिया कप स्पर्धेत 2012 पासून खेळतेय. मात्र नेपाळला आशिया कप स्पर्धेत विजयासाठी तब्बल 12 वर्षांची प्रतिक्षा करावी लागली. मात्र 12 वर्षांनंतर का होईना नेपाळने या स्पर्धेत पहिला विजय मिळवत 2024 मध्ये विजयी सलामी दिली आहे.
नेपाळचा ऐतिहासिक विजय
Nepal register their first-ever win in Women’s T20 Asia Cup with victory over UAE 👊
📝: https://t.co/fY0d0u8jmS | 📸: @ACCMedia1 pic.twitter.com/hEKiWcYkOg
— ICC (@ICC) July 19, 2024
यूएई प्लेइंग ईलेव्हन: ईशा रोहित ओझा (कॅप्टन), तीर्था सतीश (विकेटकीपर), रिनिता राजित, कविशा इगोडागे, समायरा धरणीधारका, खुशी शर्मा, लावण्य केनी, वैष्णवे महेश, इंधुजा नंदकुमार, हीना होतचंदानी, रिथिका राजित
नेपाळ प्लेइंग ईलेव्हन: इंदू बर्मा (कॅप्टन), रुबिना छेत्री, सीता राणा मगर, बिंदू रावल, काजल श्रेष्ठ (विकेटकीपर), कविता कुंवर, कबिता जोशी, पूजा महतो, समझना खडका, कृतिका मरासिनी आणि सबनम राय.