T20 World Cup 2024 | नेपाळ आणि ओमान वर्ल्ड कपसाठी क्वालिफाय

| Updated on: Nov 03, 2023 | 6:19 PM

Cricket News | क्रिकेट विश्वातून या क्षणाची अतिशय मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. रोहितच्या नेतृत्वात टीमने इतिहास रचला आहे. जाणून घ्या नक्की काय झालंय ते.

T20 World Cup 2024 | नेपाळ आणि ओमान वर्ल्ड कपसाठी क्वालिफाय
Follow us on

मुंबई | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये टीम इंडिया सुस्साट सुटलीय. टीम इंडियाने गुरुवारी 2 नोव्हेंबर रोजी श्रीलंका टीमवर 302 धावांनी विजय मिळवला. टीम इंडियाचा हा वर्ल्ड कपमधील सलग सातवा विजय ठरला. भारतीय संघाने या विजयासह रोहित शर्मा याच्या नेतृत्वात सेमी फायनलमध्ये प्रवेश केला. टीम इंडियाचा वर्ल्ड कपमधील पुढील आठवा सामना हा 5 नोव्हेंबर रोजी होणार आहे. टीम इंडियासमोर या सामन्यात दक्षिण आफ्रिकाचं आव्हान असणार आहे. या दरम्यान क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे.

कॅप्टन रोहित पौडेल याच्या नेतृत्वात नेपाळ क्रिकेट टीमने इतिहास रचला आहे. नेपाळ टीमने आगामी टी 20 वर्ल्ड कप 2024 साठी क्वालिफाय केलंय. नेपाळने टी 20 वर्ल्ड कप एशिया क्वालिफायर्स सेमी फायनलमध्ये यूएईचा धुव्वा उडवत 2024 च्या वर्ल्ड कपमध्ये स्थान मिळवलंय. नेपाळची ही टी 20 वर्ल्ड कपमध्ये सहभागी होण्याची ही दुसरी वेळ असणार आहे. नेपाळने याआधी 2014 साली पहिल्यांदा टी 20 वर्ल्ड कप खेळला होता.

आशिया खंडातून या टी 20 वर्ल्ड कपसाठी 8 पैकी 2 टीम पात्र ठरणार होत्या. त्या 2 जागांसाठी 30 ऑक्टोबरपासून आशिया क्वालिफायर स्पर्धेचं नेपाळमध्ये आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेतील सेमी फायनलमध्ये नेपाळने यूएई आणि ओमानने बहरीनवर विजय मिळवत वर्ल्ड कपचं तिकीट मिळवलं. तर 6 संघांचा बाजार उठला. आता नेपाळ आणि ओमान यांच्यात रविवारी महाअंतिम सामना होणार आहे.

दोन्ही सेमी फायनलबाबत थोडक्यात

दरम्यान आज 3 नोव्हेंबरलाच बहरीन विरुद्ध ओमान आणि यूएई विरुद्ध नेपाळ यांच्यीतील दोन्ही सेमी फायनल सामने पार पडले. ओमानने बहरीनचा 10 विकेट्सने धुव्वा उडवला. तर नेपाळने यूएईवर 8 विकेट्सने शानदार विजय मिळवला.

नेपाळ टी 20 वर्ल्ड कप 2024 साठी पात्र

टी 20 वर्ल्ड कप 2024 बाबत थोडक्यात

टी 20 वर्ल्ड कप 2024 चं यजमानपद हे अमेरिका आणि वेस्टइंडिजकडे संयुक्तरित्या आहे. या स्पर्धेत एकूण 20 संघ सहभागी होणार आहेत. नेपाळने यूएई आणि ओमानने बहरीनवर विजय मिळवत वर्ल्ड कपचं तिकीट मिळवलंय.