बुलावायो | क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. नेदरलँड भारतात होणााऱ्या वनडे वर्ल्ड कप 2023 साठी पात्र ठरली आहे. नेदरलँड वर्ल्ड कपमध्ये पोहचणारी दहावी आणि अंतिम टीम ठरलीय. स्कॉटलँडने नेदरलँडला विजयसाठी 278 धावांचे आव्हान दिले होते. नेदरलँडने हे आव्हान 42.5 ओव्हरमध्ये 6 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केले. बास डी लीडे हा नेदरलँडच्या विजयाचा शिल्पकार ठरला. नेदरलँड आता 11 नोव्हेंबर रोजी टीम इंडिया विरुद्ध भिडणार आहे. टीम इंडियाचा हा साखळी फेरीतील शेवटचा सामना असणार आहे.
नेदरलँडकडून बास डी लीडे याने सर्वाधिक 123 धावांची शतकी खेळी केली. सलामीवीर विक्रमजीत सिंह याने 40 धावा केल्या. मॅक्स ओडॉड 20 धावा करुन माघारी परतला. वेस्ली बॅरेसी 11 रन्सवर आऊट झाला. तेजा निदामनुरु याने 10 धावांचं योगदान दिलं. कॅप्टन स्कॉट एडवर्स याने 25 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. तर साकिब झुल्फिकर आणि लोगान वान बीक या जोडीने नेदरलँडला विजयापर्यंत पोहचवलं. साकिबने नाबाद आणि निर्णायक 33 धावांची खेळी साकारली. तर लोगान 1 धावेवर नाबाद राहिला.
स्कॉटलँडकडून मायकेल लीस्क याने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तर मार्क वॅट, ब्रँडन मॅकमुलेन आणि ख्रिस ग्रीव्हज या तिघांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
त्याआधी नेदरलँडने टॉस जिंकून स्कॉटलँडला बॅटिंगसाठी भाग पाडलं. स्कॉटलँडकडून ब्रँडन मॅकमुलेन याने सर्वाधिक धावा केल्या. ब्रँडन याने 11 फोर आणि 3 सिक्सच्या मदतीने 106 धावांची खेळी केली. कॅप्टन रिची बेरिंग्टन याने 64 धावांची अर्धशतकी खेळी केली. टोमस टॉमस मॅकिंटॉश याने नाबाद 38 धावा केल्या. क्रिस्टो मॅकब्राइड 32 आणि ख्रिस ग्रीव्हज याने 18 धावांच योगदान दिलं. दोघांना भोपळाही फोडता आला नाही. तर उर्वरित तिघांना दुहेरी आकडा गाठता आला नाही. स्कॉटलँडने अशाप्रकारे 50 ओव्हरमध्ये 277 धावा केल्या.
नेदरलँडकडून लीडे याने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. रायन क्लेन याने 2 तर लोगन व्हॅन बीक याने 1 विकेट घेतली.
नेदरलँडचं टीम इंडियाचं तिकीट कन्फर्म
A stunning heist! ?
Netherlands have booked their #CWC23 tickets ?✈#SCOvNED pic.twitter.com/pUkn1DsHbT
— ICC (@ICC) July 6, 2023
बास डी लीडे याची अष्टपैलू कामगिरी
Five-wicket haul ✅
Match-winning hundred ✅
Place in #CWC23 booked ✅Bas de Leede's @aramco #POTM performance in #SCOvNED will be remembered for years ? pic.twitter.com/Ohuz6dAXaY
— ICC (@ICC) July 6, 2023
नेदरलँड प्लेइंग इलेव्हन | स्कॉट एडवर्ड्स (कॅप्टन आणि विकेटकीपर), विक्रमजीत सिंग, मॅक्स ओडॉड, वेस्ली बॅरेसी, बास डी लीडे, साकिब झुल्फिकार, लोगन व्हॅन बीक, तेजा निदामनुरु, रायन क्लेन, आर्यन दत्त आणि क्लेटन फ्लॉयड.
स्कॉटलँड प्लेइंग इलेव्हन | रिची बेरिंग्टन (कर्णधार), क्रिस्टोफर मॅकब्राइड, मॅथ्यू क्रॉस (विकेटकीपर), ब्रँडन मॅकमुलेन, जॉर्ज मुन्से, टॉमस मॅकिंटॉश, मायकेल लीस्क, ख्रिस ग्रीव्हज, मार्क वॅट, सफियान शरीफ आणि ख्रिस सोल.