धर्मशाळा | कॅप्टन स्कॉट एडवर्ड्स याने केलेल्या 78 धावांच्या जोरावर नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिका टीमला विजयासाठी 246 रन्सचं टार्गेट दिलं आहे. दक्षिण आफ्रिकेने 43 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 245 धावा केल्या. नेदरलँड्सकडून कॅप्टन स्कॉट एडवर्ड्स याने सर्वाधिक नाबाद 78 धावांची खेळी केली. आर्यन दत्त याने अखेरीस झंझावाती 23 धावा केल्या. तर रोल्फे वन डेर मर्व्ह याने 29 धावांची खेळी करत चांगली साथ दिली. एडवर्ड्स, दत्त आणि मर्व्ह या त्रिकुटाने अखेरच्या क्षणी केलेल्या या खेळीने सामना पालटला. दक्षिण आफ्रिकेवरही विजयी धावांचं पाठलाग करताना दडपण असणार आहे. याच नेदरलँड्सने 2022 च्या टी 20 वर्ल्ड कपमधून दक्षिण आफ्रिकेला बाहेर केलं होतं. त्यामुळे आता सामना रंगतदार होण्याची शक्यता आहे.
पावसाच्या व्यत्ययामुळे सामन्याला विलंबाने सुरुवात झाली. पावसामुळे 7 ओव्हर कमी करण्यात आल्या. त्यामुळे 43 ओव्हरचा खेळ होणार असल्याचं निश्चित झालं. नेदरलँड्स टॉस गमावून बॅटिंगसाठी आली. नेदरलँड्स पहिल्या 4 विकेट्स झपटपट गमावल्या त्यामुळे 4 बाद 50 अशी स्थिती झाली. विक्रमजीत सिंह 2, मॅक्स ओडॉड 18, बास दी लिडे 2 आणि कुलीन एकरमन 2 धावांवर आऊट झाला. मात्र त्यानंतर नेदरलँड्सच्या फलंदाजांनी छोटेखानी भागीदारी करत सामन्यात कमबॅक केलं. त्यामुळे दक्षिण आफ्रिकावर कुठेतरी दबाव निर्माण झाला.
सायब्रँड एंजेलब्रेक्ट आणि तेजा निदामानुरु या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 32 धावांची भागीदारी केली. त्यानंतर सायब्रँड एंजेलब्रेक्ट याने 19 धावांचं योगदान दिलं. त्यामुळे नेदरलँड्सचा स्थिती 5 बाद 82 असी झाली.
त्यानंतर सहाव्या विकेटसाठी कॅप्टन एडवर्ड्स आणि निदामानुरु या दोघांनी 30 धावा जोडल्या. तेजा 20 धावांवर आऊट झाला. तेजा आऊट झाल्यानंतर कॅप्टन एडवर्ड्सने आपल्या खांद्यावर जबाबदारी घेत खिंड लढवली. एडवर्ड्स आणि लोगन व्हॅन बीक या दोघांनी सातव्या विकेटसाठी 28 रन्सची पार्टनरशीप केली. लोगन व्हॅन बीक 10 रन्स करुन तंबूत परतला.
एडवर्ड्स आणि रोएलॉफ व्हॅन डर मर्वे या दोघांनी टॉप गिअर टाकत फटकेबाजीला सुरुवात केली. या दोघांनी आठव्या विकेटसाठी फक्त 40 बॉलमध्ये 64 रन्सची पार्टनरशीप केली. व्हॅन डर मर्वे 19 बॉलमध्ये 29 धावा करुन आऊट झाला. त्यानंतर आलेल्या आर्यन दत्त याने एडवर्ड्सला चांगली साथ दिली. आर्यनने 3 गगनचुंबी सिक्स ठोकले. एडवर्ड्स आणि आर्यन या जोडीने नवव्या विकेटसाठी 41 रन्सची पार्टनरशीप केली. आर्यनने फक्त 9 बॉलमध्ये 23 धावा केल्या. तर एडवर्ड्सने 69 बॉलमध्ये 1 सिक्स आणि 10 फोरसह नाबाज 78 धावा केल्या.
दक्षिण आफ्रिकेकडून लुंगी एन्गिडी, मार्को जान्सेन आणि कगिसो रबाडा या तिघांनी 2-2 विकेट्स घेतल्या. तर गेराल्ड कोएस्झी आणि केशव महाराज या दोघांच्या खात्यात 1-1 विकटे गेली.
दक्षिण आफ्रिका प्लेईंग ईलेव्हन | टेम्बा बावुमा (कॅप्टन), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रॅसी व्हॅन डर ड्युसेन, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅनसेन, कागिसो रबाडा, केशव महाराज, लुंगी एनगिडी आणि गेराल्ड कोएत्झी.
नेदरलँड्स प्लेईंग ईलेव्हन | स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार आणि विकेटकीपर), विक्रमजीत सिंग, मॅक्स ओडॉड, कॉलिन अकरमन, बास डी लीडे, तेजा निदामानुरु, सायब्रँड एंजेलब्रेक्ट, लोगन व्हॅन बीक, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, आर्यन दत्त आणि पॉल व्हॅन मीकरेन.