न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने 2024-2025 साठी मायदेशातील मालिकेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. त्यानुसार एकूण 3 संघ न्यूझीलंड दौरा करणार आहेत. न्यूझीलंड मायदेशात इंग्लंड, श्रीलंका आणि पाकिस्तान विरुद्ध भिडणार आहे. त्यानुसार न्यूझीलंड एकूण 3 संघांविरुद्ध विविध 5 मालिकांमध्ये 17 सामने खेळणार आहे. न्यूझीलंड या वर्षभरात 3 कसोटी, 6 एकदिवसीय आणि 8 टी20i सामने खेळणार आहे. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे.
न्यूझीलंड सर्वात आधी इंग्लंड विरुद्ध भिडणार आहे. इंग्लंड न्यूझीलंड दौऱ्यात एकूण 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या टेस्ट सीरिजची सुरुवात 28 नोव्हेंबरपासून ख्राइस्टचर्च इथून होईल. त्यानंतर उर्वरित 2 सामने हे वेलिंग्टन आणि हेमिल्टन येथे होणार आहेत. त्यानंतर श्रीलंका न्यूझीलंड दौऱ्यात टी20i आणि वनडे सीरिज खेळणार आहे. दोन्ही मालिकेत प्रत्येकी 3-3 सामने खेळवण्यात येणार आहेत.
त्यानतंर न्यूझीलंड पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहे. दोन्ही संघांसाठी आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या हिशोबाने ही ट्राय सीरिज निर्णायक असणार आहे. चॅम्पिन्स ट्रॉफीनंतर पाकिस्तान न्यूझीलंड दौरा करणार आहे. पाकिस्तान न्यूझीलंड विरुद्ध टी 20i आणि वनडे सीरिज खेळणार आहे. उभयसंघात एकूण 5 टी20i आणि 3 वनडे मॅचेस होणार आहेत. पाकिस्तानच्या न्यूझीलंड दौऱ्याची सुरुवात ही 16 मार्चपासून होणार आहे.
पहिला सामना, 28 नोव्हेंबर-2 डिसेंबर, ख्राईस्टचर्च
दुसरा सामना, 6 ते 10 डिसेंबर, वेलिंग्टन.
तिसरा सामना, 14 ते 18 डिसेंबर, हॅमिल्टन.
टी 20 मालिका
पहिला सामना, 28 डिसेंबर, तौरंगा
दुसरा सामना, 30 डिसेंबर, तौरंगा
तिसरा सामना, 2 जानेवारी, नेल्सन
वनडे सीरिज
पहिला सामना, 5 जानेवारी, वेलिंग्टन
दुसरा सामना, 8 जानेवारी, हॅमिल्टन
तिसरा सामना, 11 जानेवारी,ऑकलँड
पहिला सामना, 16 मार्च, ख्राईस्टचर्च
दुसरा सामना, 18 मार्च, डुनेडिन
तिसरा सामना, 21 मार्च, ऑकलँड
चौथा सामना, 23 मार्च, टॉरंगा
पाचवा सामना, 26 मार्च, वेलिंग्टन
न्यूझीलंडचं होम शेड्यूल
The summer schedule is here!
Read more | https://t.co/BgMTnuvGJO #CricketNation pic.twitter.com/n9GXk9wK80
— BLACKCAPS (@BLACKCAPS) July 16, 2024
पहिला सामना, 29 मार्च, नेपियर
दुसरा सामना, 2 एप्रिल, हॅमिल्टन
तिसरा सामना, 5 एप्रिल, टॉरंगा