मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेला सामोरं जाण्यापूर्वी सहभागी संघ सराव सामने खेळत आहे. यामुळे भारतीय वातावरणाशी जुळवून घेता येईल असा त्या मागचा हेतू आहे. तसं पाहिलं तर पाकिस्तान, भारत, श्रीलंका आणि बांगलादेश इथलं वातावरण जवळपास सारखंच आहे. त्यामुळे विदेशी संघांना या मातीशी जुळवून घेताना त्रास होणार आहे. पण असं असलं तरी न्यूझीलंडने वनडे वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी ट्रेलर दाखवला आहे. वनडे वर्ल्डकप स्पर्धेसाठी प्रमुख दावेदार असलेल्या पाकिस्तानला पराभूत केलं आहे. पाकिस्तानने विजयासाठी 345 धावांचा डोंगर होता. पण हे आव्हान न्यूझीलंडने 5 गडी राखून पूर्ण केलं. पाकिस्तानची गोलंदाजी वर्ल्डक्लास समजली जाते. पण न्यूझीलंडने पाकिस्तानी गोलंदाजांची पिसं काढली.
नाणेफेकीचा कौल जिंकत पाकिस्तानने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. अपेक्षेप्रमाणे बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी जबरदस्त खेळी केली. आघाडीचे फलंदाज अपयशी ठरल्यानंतर मोर्चा सांभाळला. तिसऱ्या गड्यासाठी 114 धावांची भागीदारी केली. बाबर आझमने 84 चेंडूत 80 धावा, मोहम्मद रिझवान याने 94 चेंडूत 103 धावा आणि साऊद शकील याने 53 चेंडूत 75 धावा केल्या. पाकिस्तानने न्यूझीलंडसमोर 5 गडी गमवून 345 धावांचं आव्हान ठेवलं.
न्यूझीलंडला डेव्हॉन कॉनवेच्या रुपाने पहिला धक्का बसला शून्यावर बाद होऊन तंबूत परतला. त्यानंतर रचिन रविंद्र, केन विलियमसन, डेरिल मिशेल, मार्क चॅपमॅन यांनी चमकदार कामगिरी केली. रचिन रविंद्र याचं शतक अवघ्या तीन धावांनी हुकलं. पाकिस्ताने 43.4 षटकात 5 गडी गमवून 346 धावांचं आव्हान गाठलं. तसेच पाकिस्तानचा 5 गडी आणि 38 चेंडू राखून पराभव केला.
पाकिस्तानः बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, फखर जमान, इमाम-उल-हक, अब्दुल्ला शफीक, मोहम्मद रिझवान, सौद शकील, इफ्तिखार अहमद, सलमान अली आगा, मोहम्मद नवाज, उसामा मीर, हरिस रौफ, हसन अली, शाहीन आफ्रिदी , मोहम्मद वसीम.
न्यूझीलंड : केन विल्यमसन (कर्णधार), ट्रेंट बोल्ट, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम, डॅरिल मिशेल, जेम्स नीशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर, ईश सोधी, टिम साउथी, विल यंग .