NZ vs BAN : फ्लाइंग सँटनर! वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील आतापर्यंतचा सर्वोत्तम झेल, Watch Video

| Updated on: Oct 18, 2023 | 10:31 PM

World Cup 2023, NZ vs BAN : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत न्यूझीलंडने विजयाचा चौकार मारला आहे. अफगाणिस्तानला 149 धावांनी पराभूत करत अव्वल स्थान गाठलं आहे. या सामन्यात सँटनरच्या झेलची सर्वाधिक चर्चा झाली.

NZ vs BAN : फ्लाइंग सँटनर! वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील आतापर्यंतचा सर्वोत्तम झेल, Watch Video
World Cup 2023 : सँटनरचा अप्रतिम झेल पाहिलात का? सर्वोत्तम कॅच असल्याची सोशल मीडियावर रंगली चर्चा
Image Credit source: Twitter
Follow us on

मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत न्यूझीलंचा विजयी रथ पुढे पुढे जात आहे. अफगाणिस्तानला पराभूत करत न्यूझीलंडने स्पर्धेतील चौथा सामना जिंकला आहे. न्यूझीलंडने 50 षटकात 6 गडी गमवून 288 धावा केल्या आणि विजयासाठी 289 धावांचं आव्हान दिलं होतं. पण अफगाणिस्तानचा संघ फक्त 139 धावा करू शकला. न्यूझीलंडने अफगाणिस्तानवर 149 धावांनी विजय मिळवला. यामुळे न्यूझीलंडला नेट रनरेटमध्ये जबरदस्त फायदा झाला असून अव्वल स्थान गाठलं आहे. अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात न्यूझीलंडने अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं. तसेच मिचेल सँटनरने घेतलेला झेल सर्वांच्या लक्षात राहीला. इतका अप्रतिम झेल घेतला की, फ्लाइंग सँटनर म्हणून सोशल मीडियावर चर्चा होत आहे.

न्यूझीलंडचा कर्णधाराने संघाचं सातवं षटक ट्रेंट बोल्ट याच्याकडे सोपवलं. स्ट्राईकला इब्राहिम झाद्रन होता. बोल्टने आखुड टप्प्याच्या चेंडू टाकला. चेंडू लेग स्टंपवर असल्याने इब्राहिम झाद्रनने पूल खेळण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू हवा तितका वर गेला नाही. तसेच चेंडू स्क्वेअर लेगवर असलेल्या मिचेल सँटनरच्या आसपास गेला. तसा पाहिला तर हा चेंडू त्याच्यापासून खूपच लांब होता. पण त्याने हवेत उडी घेत अप्रतिम झेल टिपला. त्याने एका हाताने घेतलेला झेल पाहून सर्वच आवाक् झाले.

मिचेल सँटनर याने अप्रतिम झेल घेतल्याने इब्राहिम झाद्रन याचा डाव 14 धावांवर आटोपला. तसेच अफगाणिस्तानवर दडपण वाढत गेलं. त्यानंतर एकही फलंदाज तग धरू शकला नाही. रहमत शाह याने सर्वाधिक 36 धावा केल्या. न्यूझीलंडकडून मिचेल सँटनर आणि लोकी फर्ग्युसन यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. तर ट्रेंट बोल्ट 2, मॅट हेन्री 1 आणि रचिन रवींद्र याने 1 गडी बाद केला.

न्यूझीलंडचा पुढचा सामना भारताशी होणार आहे. हा सामना 22 ऑक्टोबरला होणार आहे. भारताने बांगलादेश विरुद्धचा सामना जिंकला तर दोन्ही संघांसाठी अव्वल स्थानासाठी लढत असणार आहे. त्यामुळे या सामन्याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून असणार आहे. भारताने स्पर्धेतील तीन सामने जिंकले असून बांगलादेशसोबत गुरुवारी सामना होणार आहे.