वूमन्स टी 20i वर्ल्ड कप 2024 स्पर्धेला 3 ऑक्टोबरपासून यूएईमध्ये सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत एकूण 10 संघ सहभागी होणार आहेत. एकूण 10 संघांमध्ये 18 दिवस 23 सामने होणार आहेत. या 10 संघांना 5-5 प्रमाणे 2 गटात विभागण्यात आलं आहे. टीम इंडिया ए ग्रुपमध्ये आहे. हरमनप्रीत कौर टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. टीम इंडियासह ए ग्रुपमध्ये पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका आणि न्यूझीलंडचा समावेश आहे. न्यूझीलंड वर्ल्ड कप मोहिमेतील आपला पहिला सामना हा टीम इंडिया विरुद्ध खेळणार आहे. हा सामना 4 ऑक्टोबरला होणार आहे. त्याआधी टीमला मोठा झटका लागला आहे. न्यूझीलंडची कर्णधार ऑलराउंर सोफी डिवाईन हीने मोठा निर्णय घेतला आहे.
ऑलराउंर सोफी डिवाईन हीने टी 20 वर्ल्ड कपनंतर कॅप्टन्सी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सोफीने वर्कलोड कमी करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेतला आहे. स्वत:च्या खेळावर लक्ष द्यावं आणि संघात नवं नेतृत्व तयार करावं, असं सोफीला वाटतं. मात्र वनडे क्रिकेटमध्ये नेतृत्व करत राहणार असल्याचं सोफीने स्पष्ट केलं.
सोफीने 56 टी 20i सामन्यात न्यूझीलंडचं नेतृत्व केलं. सोफीने आपल्या नेतृत्वात न्यूझीलंडला 56 पैकी 25 सामन्यात विजयी केलं. तर 28 वेळा पराभवाचा सामना करावा लागला. तर एक मॅच टाय राहिली. सोफीला सर्वातआधी 2014-2015 मध्ये स्टँडइन कॅप्टन करण्यात आलं होतं. त्यानंतर सोफीला 2020 मध्ये पूर्णपणे जबाबदारी देण्यात आली. मात्र सोफीने 4 वर्षांनंतर थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने अद्याप सोफीची जागा कुणाला द्यायची? याबाबतचा निर्णय केलेला नाही.
सोफी डिवाईन हीने 2006 साली पदार्पण केलं होतं. सोफीने तेव्हापासून ते आतापर्यंत 135 टी20i सामन्यांमध्ये 3 हजार 268 धावा केल्या आहेत. सोफी न्यूझीलंडकडून टी20iमध्ये सर्वाधिक धावा करणारी दुसरी फलंदाज आहे. सोफीला सध्या दुखापतीचा सामना करावा लागत आहे.
दरम्यान वूमन्स टी 20सोफी क्रिकेटमध्ये सोफीच्या नावावर वेगवान शतकाचा विक्रम आहे. सोफीने 2021 मध्ये 36 चेंडूत शतक ठोकलं होतं. सोफीने सुपर स्मॅश स्पर्धेत हा कारनामा केला होता. सोफीने या खेळीत 9 सिक्स आणि 9 चौकार ठोकले होते. सोफीने एकूण 108 धावांची नाबाद खेळी केली होती. सोफीने यासह विंडिजच्या डिएंड्रा डॉटीन हीचा 10 वर्षांआधीचा रेकॉर्ड उध्वस्त केला होता. डिएंड्राने 2010 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 38 चेंडूत शतक झळकावलं होतं.