चेन्नई | न्यूझीलंड क्रिकेट टीमने आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधील 11 वा सामना जिंकला आहे. न्यूझीलंडने बांगलादेशला पराभूत करत सलग तिसऱ्या विजयाची नोंद केली आहे. न्यूझीलंडने बांगलादेशवर 8 विकेट्सने विजय मिळवत विजयी हॅटट्रिक पूर्ण केली आहे. बांगलादेशने विजयासाठी दिलेलं 246 धावांचं आव्हान न्यूझीलंडने 2 विकेट्स गमावून पूर्ण केलं. न्यूझीलंडने 42.5 ओव्हरमध्ये 2 बाद 248 धावा केल्या. न्यूझीलंडने 43 बॉल राखून आव्हान पूर्ण केल्याने त्यांना नेट रनरेटमध्ये फायदा झाला आहे. तसेच न्यूझीलंडने या विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानी झेप घेतली आहे.
न्यूझीलंड 246 धावांचा पाठलाग करताना पहिली विकेट झटपट गमावली. रचिन रवींद्र 9 धावांवर आऊट झाला. त्यानंतर डेव्हॉन कॉनव्हे आणि कॅप्टन केन विलियमन्सन या दोघांनी दुसऱ्या विकटेसाठी 80 धावांची भागीदारी केली. डेव्हॉन कॉन्वहे याने 45 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. त्यानंतर केन आणि डेरॅल मिचेल या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 110 बॉलमध्ये 108 धावांची मॅचविनिंग पार्टनरशीप केली. या दरम्यान मिचेल आणि केन या दोघांनी वैयक्तिक अर्धशतक झळकावली.
मिचेल आणि केन ही जोडीच न्यूझीलंडला विजयी करणार असल्याचं वाटत होतं. मात्र केनला धावा घेतला हाताला बॉल लागला. त्यामुळे केनला दुखापत झाली. त्यामुळे केन 78 धावांवर रिटायर्ड हर्ट झाला. केनने 107 बॉलमध्ये 8 फोर आणि 1 सिक्सच्या मदतीने या 78 धावा केल्या. केननंतर ग्लेन फिलिप्स मैदातान आला. फिलिप्स आणि डॅरेल या जोडीने न्यूझीलंडला विजयी केलं. डॅरेल याने खणखणीत सिक्स ठोकत न्यूझीलंडची विजयी हॅटट्रिक पूर्ण केली.
डॅरेलने 67 बॉलमध्ये 6 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने नाबाद 89 धावा केल्या. तर ग्लेन फिलिप्स 16 रन्सवर नॉट आऊट परतला. बांगलादेशकडून मुस्तफिजुर रहमान आणि कॅप्टन शाकिब अल हसन या दोघांनी 1-1 विकेट घेतली.
न्यूझीलंडचा दमदार विजय
A winning start to back to back games in Chennai! @dazmitchell47 (89*) and Kane Williamson (78*) guide the team home to make it 3/3 so far at the @cricketworldcup. Scorecard | https://t.co/aNkBrDiAuv #CWC23 pic.twitter.com/IpRdQRTgxY
— BLACKCAPS (@BLACKCAPS) October 13, 2023
दरम्यान त्याआधी न्यूझीलंडने टॉस जिंकून बांगलादेशला बॅटिंगसाठी बोलावलं. बांगलादेशने मुशफिकर रहिम याच्या 66, शाकिबच्या 40 आणि महमदुल्लाह याच्या नाबाद 41 धावांच्या जोरावर 9 विकेट्स गमावून 245 धावा केल्या. न्यूझीलंडकडून लॉकी फर्ग्यूसन याने सर्वाधिक 3 विकेट्स मिळवल्या.
बांग्लादेश प्लेईंग ईलेव्हन | शाकिब अल हसन (कर्णधार), लिटॉन दास, तांजीद हसन, नजमुल हुसैन शांतो, मेहदी हसन मिराज,मुश्फिकुर रहीम (विकेटकीपर), तॉहीद हृदोय, महमुदुल्लाह, तस्कीन अहमद, शोरफुल इस्लाम आणि मुस्तफिजुर रहमान
न्यूझीलंड प्लेईंग ईलेव्हन | केन विलियमसन (कॅप्टन), डेव्हॉन कॉन्वहे, रचिन रवींद्र, डेरिल मिशेल, टॉम लॅथम (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमॅन, मिचेल सँटनर, मॅट हेनरी, लॉकी फर्ग्यूसन आणि ट्रेन्ट बोल्ट.