बंगळुरु | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधील 41 व्या सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका आमनेसामने आहेत. या सामन्याचं आयोजन हे बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. या सामन्याला दुपारी 2 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 1 वाजून 30 मिनिटांनी टॉस करण्यात आला. न्यूझीलंडने टॉस जिंकला. कॅप्टन केन विलियमसन याने फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. श्रीलंका आणि न्यूझीलंड दोन्ही संघांनी या सामन्यासाठी प्लेईंग ईलेव्हनमध्ये बदल केले आहेत.
श्रीलंका आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांचा हा वर्ल्ड कप साखळी फेरीतील अखेरचा सामना आहे. श्रीलंका वर्ल्ड कपमधून बाहेर पडली आहे. त्यामुळे श्रीलंकेसाठी ही हा सामना केवळ औपचारिकता आहे. मात्र न्यूझीलंडला सेमी फायनलमध्ये पोहचण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत हा सामना जिंकावा लागणार आहे. त्यामुळे न्यूझीलंडसाठी हा सामना फार महत्त्व आहे. तर श्रीलंका शेवट गोड करण्याचा प्रयत्नात आहे. त्यामुळे न्यूझीलंडचा खेळ खल्लास होऊ शकतो.
न्यूझीलंड प्लेईंग ईलेव्हन आणि श्रीलंका प्लेईंग ईलेव्हनमध्ये 1-1 बदल करण्यात आला आहे. लॉकी फर्ग्यूसन याला संधी देण्यात आली आहे. तर ईश सोढी याचा बाहेर बसवलंय. तर कसून राजिथा हा खेळत नसल्याने त्याच्या जागी चामिका करुणारत्ने याला संधी देण्यात आली आहे.
न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका दोन्ही संघ वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत एकूण 11 वेळा आमनेसामने आले आहेत. या 11 पैकी सर्वाधिक सामने जिंकण्यात श्रीलंकेला यश आलं आहे. श्रीलंकेने 11 पैकी 6 सामने जिंकले आहेत. तर न्यूझीलंडला 5 सामने जिंकता आले आहेत. दरम्यान एण चिन्नास्वामी स्टेडियममधील वनडे वर्ल्ड कप 2023 मधील हा चौथा सामना आहे. या आधीच्या 3 सामन्यात चेसिंग करणारी टीम 2 आणि पहिल्यांदा बॅटिंग करणारी टीम 1 वेळा जिंकली आहे.
न्यूझीलंडने टॉस जिंकला
New Zealand won the toss and elected to field first. #SLvNZ #CWC23 #LankanLions pic.twitter.com/6m78Ypy6id
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) November 9, 2023
श्रीलंका प्लेईंग ईलेव्हन | कुसल मेंडिस (कॅप्टन आणि विकेटकीपर), पाथुम निसांका, कुसल परेरा, सदीरा समरविक्रमा, चारिथ असालंका, अँजेलो मॅथ्यूज, धनंजया डी सिल्वा, चमिका करुणारत्ने, महेश तीक्षना, दुष्मंथा चमीरा आणि दिलशान मधुशानका.
न्यूझीलंड प्लेईंग ईलेव्हन | केन विल्यमसन (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, टॉम लॅथम (विकेटकीपर), टिम साउथी, लॉकी फर्ग्युसन आणि ट्रेंट बोल्.