मुंबई : अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेत भारत आणि न्यूझीलंड संघ आमनेसामने आहेत. न्यूझीलंडने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे. भारताला प्रथम फलंदाजीचं निमंत्रण दिलं आहे. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर न्यूझीलंडचा कर्णधार ऑक्सर जॅक्सन याने सांगितलं की, “आमच्याकडे प्रथम गोलंदाजी करू. खेळपट्टीवर थोडेसे गवत असेल आणि ते कठीण आहे. त्यामुळे आम्ही दिलेलं आव्हान आरामात पेलू शकतो. भारताविरुद्धच्या सामन्यात आम्ही संघात तीन बदल केले आहेत.” सुपर सिक्स फेरीतून सहापैकी चार संघांची उपांत्य फेरीत निवड होणार आहे. त्यामुळे गुणतालिकेत टॉप चारमध्ये राहणं गरजेचं आहे. यासाठी सुपर सिक्समधील प्रत्येक संघ सज्ज आहे. श्रीलंका विरुद्ध वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान विरुद्ध आयर्लंड यांच्यातही सामना सुरु आहे. पाकिस्तानने गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. तर श्रीलंकेने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे.
भारतीय कर्णधार उदय सहारन याने न्यूझीलंडने घेतलेल्या निर्णयानंतर आनंद व्यक्त केलाआहे. “आम्हाला प्रथम फलंदाजी करायाची होती त्यामुळे त्यांच्या निर्णयामुळे आम्ही आनंदी आहोत. या खेळपट्टीवर आम्ही आयर्लंडविरुद्ध खेळलो असल्याने आमच्या गाठिशी एक चांगला अनुभव आहे. संघात कोणताही बदल केलेला नाही.” भारताकडून आदर्श सिंग आणि आर्शिन कुलकर्णी ही जोडी मैदानात उतरली आहे. या जोडीकडून भारतीय क्रीडाप्रेमींना फार अपेक्षा आहेत.
मैदानाबाबत सांगायचं तर सरळ 80 मीटर लांब षटकार आहे. ऑन साईडला 66 मीटर, तर ऑफ साईटला 62 लांब षटकार आहे. या खेळपट्टीवर सुरुवातीला फलंदाजांना संघर्ष करावा लागू शकतो. पण त्यानंतर खोऱ्याने धावा होतील. गोलंदाजांना आपल्या लेंथवर लक्ष केंद्रीत करावं लागेल.
न्यूझीलंड अंडर 19 (प्लेइंग इलेव्हन): जेम्स नेल्सन, टॉम जोन्स, स्नेहिथ रेड्डी, लचलान स्टॅकपोल, ऑस्कर जॅक्सन (कर्णधार), ऑलिव्हर टेवाटिया, झॅक कमिंग, एलेक्स थॉम्पसन (विकेटकीपर), इवाल्ड श्र्युडर, रायन त्सोर्गस, मेसन क्लार्क
भारत अंडर 19 (प्लेइंग इलेव्हन): आदर्श सिंग, अर्शीन कुलकर्णी, मुशीर खान, उदय सहारण (कर्णधार), प्रियांशू मोलिया, सचिन धस, अरावेली अवनीश (विकेटकीपर), मुरुगन अभिषेक, नमन तिवारी, राज लिंबानी, सौम्य पांडे