Team India | टीम इंडियाचा वर्ल्ड रेकॉर्ड, रोहितसेनेची ऐतिहासिक कामगिरी

| Updated on: Mar 13, 2023 | 12:57 PM

टीम इंडियाने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. टीम इंडिया क्रिकेट विश्वात सलग दुसऱ्यांदा अशी कामगिरी करणारी पहिलीत टीम ठरली आहे.

Team India | टीम इंडियाचा वर्ल्ड रेकॉर्ड, रोहितसेनेची ऐतिहासिक कामगिरी
Follow us on

अहमदाबाद | टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात अहमदाबादमध्ये चौथ्या कसोटीतील पाचव्या दिवसाचा खेळ सुरु आहे. टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये पोहचण्यासाठी या सामन्यात विजय मिळवणं बंधनकारक आहे. मात्र हा सामना ड्रॉ होणार असल्याचं दिसतंय. पण आता या सामन्याचा निकाल काहीही लागो, टीम इंडियासाठी मोठी गूडन्युज आली आहे. टीम इंडियाने या सामन्याच्या निकालाआधीच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. यासह टीम इंडियाने वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे.

न्यूझीलंडने थरारक झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात श्रीलंकेवर 2 विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह न्यूझीलंडने 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. न्यूझीलंडच्या या विजयामुळे टीम इंडियाचं WTC Final 2023 चं तिकीट कन्फर्म झालं आहे.

हे सुद्धा वाचा

टीम इंडियाने बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील पहिले 2 सामने सलग जिंकले होते. इंदूरमधील तिसरा सामना जिंकून टीम इंडियाला wtc final मध्ये थेट एन्ट्री मिळवण्याची संधी होती. मात्र तिथे ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा पराभव केला. त्यामुळे चौथ्या सामन्यात टीम इंडियाला विजय मिळवणं गरजेचं होतं.

तसेच या सामन्यात जर टीम इंडियाचा पराभव झाला असता तर, टीम इंडियाचं सर्व भवितव्य हे न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका यांच्यातील पहिल्या सामन्याच्या निकालावर अवलंबून होतं. मात्र या चौथ्या कसोटीआधीच तिथे न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका पहिल्या कसोटी सामन्याचा निकाल लागला. त्यामुळे टीम इंडियाने wtc final मध्ये एन्ट्री मारली.

टीम इंडियाची दुसऱ्यांदा WTC Final मध्ये धडक

न्यूझीलंडचा विजय किंवा सामना अनिर्णित अशा 2 परिस्थितीत टीम इंडियाचं wtc final तिकीट कन्फर्म होणार होतं. मात्र सामना हा अतिशय रंगतदार झाला होता. श्रीलंकेने न्यूझीलंडला विजयासाठी 285 धावांचं आव्हान दिलं होतं. हे विजयी आव्हान न्यूझीलंडने 8 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं.

जर समजा हा सामना श्रीलंकेने जिंकला असता आणि टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया विरुद्धचा सामना गमावला किंवा अनिर्णित राखला असता, तर टीम इंडियाचं wtc final चं भवितव्य हे न्यूझीलंड-श्रीलंका यांच्यात होणाऱ्या दुसऱ्या कसोटीच्या निर्णयावर अवलंबून राहिलं असतं. अर्थात काय,तर टीम इंडियाची प्रतिक्षा आणखी वाढली असती. मात्र न्यूझीलंडने श्रीलंकेवर मात करत टीम इंडियासाठी wtc final चे दरवाजे उघडून दिले.

टीम इंडियाचा वर्ल्ड रेकॉर्ड

दरम्यान टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये दुसऱ्यांदा पोहचणारी पहिली टीम ठरली आहे. हा वर्ल्ड रेकॉर्ड आहे. याआधी टीम इंडियाने 2021 मध्ये अंतिम फेीत धडक मारली होती. तेव्हा टीम इंडियाला न्यूझीलंडकडून पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र यंदा पुन्हा एकदा टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन होण्याची संधी आहे. या फायनलमध्ये टीम इंडियाचा सामना हा ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणार आहे. हा अंतिम सामना 7 जूनपासून द ओव्हल स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.