नितीश कुमार रेड्डीने टीम इंडियासाठी संकटमोचक खेळी खेळली. मेलबर्न कसोटी सामन्यात टीम इंडिया संकटात असताना शतक ठोकलं. त्याच्या या खेळीमुळे सामन्यात जीव आला आहे. दुसऱ्या दिवशी हा सामना ऑस्ट्रेलियाच्या पारड्यात झुकलेला होता. मात्र नितीश कुमार रेड्डीमुळे सामन्यात कमबॅक झालं. मुलाची ही खेळी पाहण्यासाठी त्याचे वडील मुत्याला रेड्डी हे मैदानात उपस्थित होते. मुलाचा कारनामा पाहून त्यानाही अश्रू अनावर झाले. शतकी खेळी केल्यानंतर मुलाने बॅट वर करताच त्यांची छाती अभिमानाने फुलली. मुलासाठी 80 हजार लोकं उभी राहिल्याचं पाहून त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. तसेच वर पाहून देवाचे आभार व्यक्त हात जोडले. त्याच्या खेळीने त्याच्या आयुष्याचा संघर्ष यशस्वी झाला. नितीश कुमार फलंदाजीसाठी आला तेव्हा भारताच्या 6 गडी बाद 191 धावा होत्या. असं असूनही नितीशने आशा सोडली नाही आणि टीम इंडियाला संकटातून बाहेर काढण्यासाठी लढत राहिला.
नितीश कुमार रेड्डीची मेलबर्न कसोटीतील प्लेइंग इलेव्हनमध्ये निवड झाल्याने अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. पण आता नितीशने शतक खेळी करत सर्व प्रश्नांना जशाच तसं उत्तर दिलं आहे. तसेच वडिलांना प्रश्न विचारणाऱ्या टोचून बोलणाऱ्या नातेवाईकांचीही बोलती बंद केली आहे. यासह त्याने अनेक वर्षे त्रास देणाऱ्यांना एका झटक्यात गप्प केलं आहे.
NITISH CENTURY!
A glorious lofted drive brings up the milestone!
His dad in tears in the stands, what a moment 🙌#AUSvIND pic.twitter.com/W1SJNHlN4J
— 7Cricket (@7Cricket) December 28, 2024
नितीश कुमार रेड्डी यांचे वडील मुत्याला रेड्डी यांचे वडील हिंदुस्थान झिंकमध्ये सरकारी नोकरीत होते. पण होम टाउन विशाखापट्टनममधील काम बंद झाल्याने त्यांची उदयपूरला बदली केली. पण मुलाचं क्रिकेट ट्रेनिंग बंद होऊ नये यासाठी त्यांनी 25 वर्षांची सरकारी नोकरी सोडली आणि निवृ्त्ती घेतली. ते पूर्णपणे निवृत्तीच्या फंडावर अवलंबून होते. अनेकदा आर्थिक अडचणीला सामोरं जावं लागलं. तेव्हा त्यांना नातेवाईकांकडून बरंच काही ऐकावं लागलं. नातेवाईकांनी त्यांच्या निर्णयावर बोट ठेवलं. पण नितीशच्या आईने त्यांना पूर्ण पाठिंबा दिला. त्यानंतर त्यांनी पूर्णपणे मुलाच्या प्रशिक्षणावर लक्ष केंद्रीत केलं. आता कुठे त्यांच्या संघर्षाला यश मिळालं आहे.