क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. अफगाणिस्तानचा अनुभवी ऑलराउंडर आणि माजी कर्णधार मोहम्मद नबी याने मोठी घोषणा केली आहे. नबीने आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेनंतर एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त होणार असल्याचं जाहीर केलं आहे. नबी आयसीसी वनडे रँकिंगमध्ये नंबर 1 ऑलराउंडर आहे. नबीने 2009 साली स्कॉटलँडविरुद्ध एकदिवसीय पदार्पण केलं होतं. नबी तेव्हापासून सातत्याने अफगाणिस्तानसाठी 15 वर्षांपासून खेळतोय. नबीने याआधीच 5 वर्षांपूर्वीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. तर नबीने टी 20i क्रिकेट खेळत राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.
अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिराकी नसीब खान यांनी मोहम्मद नबी याच्या निवृत्तीबाबतची माहिती दिली. क्रिकबजच्या वृत्तानुसार, मोहम्मद नबी याने अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाला निवृत्तीच्या निर्णयाची माहिती दिली आहे. तसेच क्रिकेट बोर्डाने नबीच्या निवृत्तीला हिरवा कंदील दाखवला आहे. नबी टेस्ट आणि वनडे रिटायरमेंटनंतर 2026 साली होणाऱ्या टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेपर्यंत खेळू शकतो.
“मोहम्मद नबी याने मला काही महिन्यांआधीच आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर निवृत्त होणार एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त होणार असल्याचं सांगितलं होतं. आम्ही नबीच्या या निर्णयाचं स्वागत करतो”, असं नसीब खान यांनी म्हटलं.
नबी अफगाणिस्तानच्या अनुभवी खेळाडूंपैकी एक आहे. नबी बॅटिंगसह स्पिन बॉलिंगही करतो. नबीने आतापर्यंत अफगाणिस्तानला एकहाती सामने जिंकून दिले आहेत. नबीने नुकतंच बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात 79 बॉलमध्ये 84 धावांची खेळी केली होती.
मोहम्मद नबी एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त होण्यासाठी सज्ज
🚨 UPDATE 🚨
Afghanistan’s ace all-rounder, President Mohammad Nabi, is set to retire from ODI cricket after the conclusion of the upcoming 2025 Champions Trophy in Pakistan. pic.twitter.com/cyN4TwibOJ
— CricTracker (@Cricketracker) November 8, 2024
मोहम्मद नबीने पदार्पणातील सामन्यातच आपली छाप सोडली होती. नबीने 2009 साली स्कॉटलँडविरुद्ध पदार्पणाच्या सामन्यात अर्धशतकी खेळी करत सर्वांचं लक्ष वेधलं होतं. नबीने आतापर्यंत 165 एकदिवसीय सामन्यांमध्ये 27.30 च्या स्ट्राईक रेटने 3 हजार 549 धावा केल्या आहेत. तसेच 171 विकेट्सही घेतल्या आहेत.