मुंबई : न्यूझीलंड पाकिस्तान विरुद्ध कसोटी मालिका जिंकता जिंकता राहिली. दुसऱ्या कसोटीत न्यूझीलंड विजयापासून 1 विकेट दूर राहिली. कसोटीनंतर आता एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. उभयसंघात 9 जानेवारीपासून एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. या एकदिवसीय मालिकेआधी न्यूझीलंडला मजबूत झटका लागला आहे. ज्यामुळे टीममध्ये बदल करावा लागला आहे. कसोटी मालिका अनिर्णित राहिल्यानंतर न्यूझीलंडला हा बदल महागात पडू शकतो. न्यूझीलंड पाकिस्तान दौऱ्यानंतर भारत दौऱ्यावर येणार आहे. टीम इंडिया विरुद्धच्या वनडे सीरिजमध्येही न्यूझीलंडला या ऑलराउंडरशिवाय मैदानात उतरावं लागणार आहे. (nz new zealand matt henry ruled out against pakistan and team india odi series)
कराचीतील दुसऱ्या कसोटीतील पाचव्या दिवशी मॅट हॅनरीला पाकिस्तान आणि टीम इंडिया विरुद्धच्या वनडे सीरिजमधून बाहेर पडावं लागलं आहे. न्यूझीलंडन क्रिकेटने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. मॅट दुसऱ्या कसोटीतील 5 व्या दिवशी झालेल्या दुखापतीमुळे पाकिस्तान विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेचा भाग नसेल आणि कसोटी संघातील इतर सहकाऱ्यांसोबत न्यूझीलंडला परतेल. त्याच्या जागी दुसऱ्या खेळाडूचं नाव लवकरच जाहीर केलं जाईल”, असं ट्विटमध्ये म्हटलंय.
Matt Henry will return home with other members of the Test Squad not taking part in the ODI Series against Pakistan after suffering an abdominal strain on Day 5 of the 2nd Test in Karachi. A replacement in the ODI Squad to face Pakistan and India will be confirmed soon. #PAKvNZ pic.twitter.com/DmzEIDcgJa
— BLACKCAPS (@BLACKCAPS) January 7, 2023
पाक-न्यूझीलंड 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला 9 जानेवारीपासून सुरुवात होतेय. यानंतर 11 आणि 13 जानेवारीला अनुक्रमे दुसरा आणि तिसरा सामना खेळवण्यात येईल. पाकिस्तान दौऱ्यानंतर न्यूझीलंड 18 जानेवारी-1 फेब्रुवारी या कालावधीत भारत दौऱ्यावर येईल. या दौऱ्यात उभयसंघात वनडे आणि टी 20 मालिका खेळवण्यात येईल.
केन विलियमसन पाकिस्तान विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत कर्णधआरपद सांभाळेल. मात्र टीम इंडिया विरुद्ध नेतृत्वाची जबाबदारी विलियमसनकडे नसेल. टॉम लॅथम टीम इंडिया विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत कर्णधार असणार आहे. टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात अनुक्रमे 18, 21 आणि 24 जानेवारीला एकदिवसीय सामन्याचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यानंतर उभयसंघात टी 20 मालिका खेळवण्यात येईल. न्यूझीलंडने या टी 20 मालिकेसाठी संघ जाहीर केलेला नाही.