NZ VS AFG | अवघ्या 1 धावात 3 विकेट्स, न्यूझीलंडची अफगाणिस्तानसमोर दुर्दशा, पाहा व्हीडिओ

| Updated on: Oct 18, 2023 | 5:08 PM

New Zealand lost 3 wickets only 1 run | न्यूझीलंडने पहिल्या विकेटनंतर चांगली सुरुवात केली होती. मात्र त्यानंतर अफगाणिस्तानने न्यूझीलंडला दणका देत 1 धावेच्या मोबदल्यात 3 मोठ्या विकेट्स घेतल्या.

NZ VS AFG | अवघ्या 1 धावात 3 विकेट्स, न्यूझीलंडची अफगाणिस्तानसमोर दुर्दशा, पाहा व्हीडिओ
Follow us on

चेन्नई | अफगाणिस्तान विरुद्ध वर्ल्ड कप 2023 मधील सलग चौथ्या विजयासाठी मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडचा डब्बा गूल झाला आहे. अफगाणिस्तानच्या बॉलिंगसमोर न्यूझीलंडच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. पहिली विकेट झटपट गमावल्यानंतर न्यूझीलंडने जोमात दुसऱ्या विकेटसाठी पार्टनरशीप केली. मात्र त्यानंतर न्यूझीलंडने अवघ्या 1 धावेच्या मोबदल्यात झटपट 3 विकेट्स गमावल्या. अफगाणिस्तानने न्यूझीलंडच्या 3 मोठ्या आणि धोकादायक फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवत जोरदार कमबॅक केलं.

अफगाणिस्तानने टॉस जिंकून न्यूझीलंडला बॅटिंगसाठी भाग पाडलं. न्यूझीलंडने सावध सुरुवात केली. डेव्हॉन कॉनव्हे आणि विल यंग या दोघांनी 30 धावांची सावध सलामी भागीदारी केली. मात्र मुजीब उर रहमान याने ही जोडी फोडत अफगाणिस्तानला पहिली विकेट मिळवून दिली. मुजीबने अफगाणिस्तानची मोठी डोकेदुखी मिटवली. मुजीबने धोकादायक डेव्हॉन कॉनव्हे याला 20 धावांवर एलबीडब्ल्यू आऊट केलं.

दुसऱ्या विकेटसाठी संयमी भागीदारी

डेव्हॉननंतर जोरदार फॉर्मात असलेला रचिन रवींद्र मैदानाता आला. रचिनने विलला चांगली साथ दिली. या दोघांनी जम बसवला आणि मोठ्या भागीदारीच्या दिशेने वाटचाल सुरु केली. या दोघांमध्ये दुसऱ्या विकेटसाठी 79 धावांची भागीदारी केली. त्यामुळे अफगाणिस्तान कुठेतरी पिछाडीवर पडली. त्यामुळे अफगाणिस्तान विकेटच्या शोधात होती. अझमतुल्लाह याने अफगाणिस्तानची प्रतिक्षा संपवली.

अझमतुल्लाह याने इन फॉर्म रचिन रवींद्र याला 32 धावांवर क्लिन बोल्ड केला. अझमतुल्लाह याने रवींद्रचा मिडल स्टंप उडवला. रचिन आऊट झाल्याने न्यूझीलंडची 20.2 ओव्हरमध्ये 2 बाद 109 अशी स्थिती झाली. अझमतुल्लाह याने याच ओव्हरमधील सहाव्या बॉलवर सेट असलेल्या विल यंग याचा काटा काढला. अझमतुल्लाह याने विलला इक्रम अलीखिल याच्या हाती 54 धावांवर कॅच आऊट केलं. त्यामुळे न्यूझीलंडची 20.6 म्हणजेच 21 ओव्हरमध्ये 3 बाद 110 अशी स्थिती झाली.

त्यानंतर न्यूझीलंडच्या डावातील 22 ओव्हर टाकायला आला. राशिदने डॅरेल मिचेल याला इब्राहीम झद्रान याच्या हाती 1 रनवर कॅच आऊट केलं. त्यामुळे न्यूझीलंड 21.4 ओव्हरमध्ये 4 बाद 110 अशी घसरगुंडी झाली.

न्यूझीलंड प्लेईंग ईलेव्हन | डेव्हॉन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (कॅप्टन आणि विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मिचेल सँटनर, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन आणि ट्रेन्ट बोल्ट.

अफगाणिस्तान प्लेईंग ईलेव्हन | हशमतुल्ला शाहिदी (कॅप्टन), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झद्रान, रहमत शाह, मोहम्मद नबी, इक्रम अलीखिल, अजमातुल्ला उमरझाई, रशीद खान, मुजीब उर रहमान, नवीन-उल-हक आणि फजलहक फारुकी.