NZ vs AFG | अफगाणिस्तान खराब फिल्डिंगचा फटका, न्यूझीलंडकडून 289 रन्सचं टार्गेट

| Updated on: Oct 18, 2023 | 6:47 PM

New Zealand vs Afghanistan | अफगाणिस्तानच्या सुमार फिल्डिंगचा फायदा हा न्यूझीलंडने अखेरच्या 10 ओव्हरमध्ये घेत 280 पेक्षा धावा केल्या. अफगाणिस्ताने सामन्यावरची पकड अखेरच्या याच 10 ओव्हरमध्ये गमावली.

NZ vs AFG | अफगाणिस्तान खराब फिल्डिंगचा फटका, न्यूझीलंडकडून 289 रन्सचं टार्गेट
Follow us on

चेन्नई | न्यूझीलंड क्रिकेट टीमने अफगाणिस्तानच्या ढिसाळ फिल्डिंगचा चांगला फायदा घेत 280 पार मजल मारली आहे. न्यूझीलंडने अफगाणिस्तानला विजयासाठी 289 धावांचं आव्हान दिलं आहे. न्यूझीलंडने 50 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 288 धावा केल्या. अफगाणिस्तानकडे न्यूझीलंडला झटपट गुंडाळण्याची संधी होती. मात्र अफगाणिस्तानने 4 कॅच आणि 1 स्टंपिंगची संधी सोडली. न्यूझीलंडने याच संधीचा फायदा घेत अखेरच्या क्षणी घेत मोठा स्कोअर केला.

न्यूझीलंड टॉस गमावून बॅटिंगसाठी आली. अफगाणिस्तानने न्यूझीलंडला 30 धावांवर पहिला झटका देत डेव्हॉन कॉनव्हे याला 20 धावांवर चालता केला. त्यानंतर रचिन रवींद्र आणि विल यंग या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 79 धावांची भागादारी केली. ही पार्टनरशीप अझमतुल्लाह याने फोडली. अझमतुल्लाह याने आपल्या पहिल्याच ओव्हरमध्ये डबल अटॅक केला. अझमतुल्लाह याने रचीन रविंद्र याला 32 आणि विल यंग याला 54 धावांवर आऊट केलं. त्यानंतर पुढच्याच ओव्हरमध्ये (22) राशिद खान याने डॅरेल मिचेल याला आऊट केलं.

अफगाणिस्तानने अवघ्या 1 धावेच्या मोबदल्यात न्यूझीलंडच्या 3 विकेट्स झटकल्या. त्यामुळे न्यूझीलंडची 4 बाद 110 अशी स्थिती झाली. अफगाणिस्तानने न्यूझीलंडच्या मिडल ऑर्डरचा कणा मोडत मॅचमध्ये कमबॅक केलं. आता सामन्यात अफगाणिस्तानने घट्ट पकड मिळवली. तर न्यूझीलंड बॅक फुटलर ढकलली गेली. मात्र अफगाणिस्तानला मिळालेल्या मूमेंटमचा फायदा घेता आला नाही.

न्यूझीलंडचं कमबॅक

अफगाणिस्तानने सामन्यादरम्यान एकूण 4 कॅचेस सोडल्या. इथेच अफगाणिस्तानने कच खाल्ली. तर अडचणीत सापडलेल्या न्यूझीलंडला कॅप्टन टॉम लॅथम आणि ग्लेन फिलिप्स या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 144 धावांची निर्णायक आणि गेमचेंजिद पार्टनरशीप केली. या दरम्यान दोघांनी वैयक्तिक अर्धशतक झळकावली. नवीन उल हक याने ही सेट जोडी फोडली. नवीननेही डबल अॅटेक केला. नवीनने एकाच ओव्हरमध्ये या जोडीला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. नवीनने ग्लेन फिलिप्स याला 71 धावांवर आऊट केलं. ग्लेन फिलिप्स याने 80 बॉलमध्ये 4 सिक्स आणि 4 फोरच्या मदतीने 71 धावा केल्या. तर कॅप्टन लॅथमला 68 धावांवर आऊट केलं.

तर न्यूझीलंडकडून अखेरीस मार्क चॅपमॅन याने 12 बॉलमध्ये नाबाद 25 आणि मिचेल सँटनरने 7 बॉलमध्ये नॉट आऊट 5 रन्स केल्या. अफगाणिस्तानकडून नवीन उल हक आणि अझमतुल्लाह या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर मुजीब उर रहमान आमि राशिद खान या दोघांच्या खात्यात 1-1 विकेट गेली.

न्यूझीलंडचा दर 10 ओव्हरनुसार स्कोअर

1-10 ओव्हर, 43-1.

11-20 ओव्हर, 66-0.

21-30 ओव्हर, 29-3.

31-40 ओव्हर, 47-0.

41.50 ओव्हर, 103-2.

न्यूझीलंड प्लेईंग ईलेव्हन | डेव्हॉन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (कॅप्टन आणि विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मिचेल सँटनर, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन आणि ट्रेन्ट बोल्ट.

अफगाणिस्तान प्लेईंग ईलेव्हन | हशमतुल्ला शाहिदी (कॅप्टन), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झद्रान, रहमत शाह, मोहम्मद नबी, इक्रम अलीखिल, अजमातुल्ला उमरझाई, रशीद खान, मुजीब उर रहमान, नवीन-उल-हक आणि फजलहक फारुकी.