NZ vs BAN : मुश्फिकुर रहीम याने लाथ मारताच पंचांनी घोषित केलं बोल्ड, Video व्हायरल

| Updated on: Sep 26, 2023 | 5:49 PM

NZ vs BAN, 3rd ODI : न्यूझीलंड विरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात बांगलादेशचा संपूर्ण 171 धावांवर बाद झाला. पण या सामन्यातील एका कृतीने क्रीडाप्रेमी आवाक् झाले आहेत. मुश्फिकुर रहिम याने तशी वेळ येताच स्टंपवरच लाथ मारली.

NZ vs BAN : मुश्फिकुर रहीम याने लाथ मारताच पंचांनी घोषित केलं बोल्ड,  Video व्हायरल
NZ vs BAN, Video : मुश्फिकुर रहिम याने ओलांडल्या सर्व मर्यादा, लाथ मारल्यानंतर पंचांचा बोल्डचा निर्णय
Follow us on

मुंबई : बांगलादेश आणि न्यूझीलंड यांच्यात वनडे मालिका सुरु आहे. वनडे वर्ल्डकप 2023 पूर्वी ही मालिका दोन्ही संघांसाठी महत्त्वाची आहे. पण बांगलादेशचा संघ न्यूझीलंडसमोर फिका पडल्याचं दिसून आला आहे. बांगलादेशचा संघाची फलंदाजी पुन्हा एकदा फ्लॉप ठरली आहे. तिसऱ्या वनडे सामन्यात बांगलादेशचा संघ 171 धावांवर बाद झाला. यात कर्णधार नजमुल शांतो याने 76 धावा केल्या. या शिवाय एकही फलंदाज चांगली कामगिरी करू शकला नाही. दुसरीकडे, अनुभवी फलंदाज आमइ विकेटकीपर मुश्फिकुर रहीम वाईट पद्धतीने बाद झाला. स्टंपवर लाथ मारल्याने बाद झाला आणि आता सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. मुश्फिकुर रहीम 16 व्या षटकात लोकी फर्ग्युसन याच्या गोलंदाजीचा सामना करत होता. पहिल्याच चेंडूवर गडबड झाली आणि बाद होत तंबूत परतावं लागलं.

लोकी फर्ग्युसन याने टाकलेल्या पहिल्या चेंडूवर रहीमने डिफेंस केला. पण डिफेंस केलेला चेंडू थेट स्टंपच्या दिशेने जात होता. त्यामुळे चेंडू अडवण्यासाठी त्याने जोरात लाथ मारली. पण चेंडू ऐवजी लाथ थेट स्टंपला लागली आणि बेल्स उडाल्या.यामुळे रहीला हीट विकेट ऐवजी बोल्ड घोषित करण्यात आलं. पण मुश्फिकुर ज्या पद्धतीने आऊट झाला त्याची जोरदार चर्चा रंगली आहे.मुश्फिकुर रहिम याने 25 चेंडूत 18 धावाची खेळी केली. यात दौन चौकारांचा समावेश आहे.

तिसऱ्या वनडे सामन्यात एडम मिल्न याने बांगलादेशच्या फलंदाजांनी सळो की पळो करू सोडलं. 34 धावा देत 4 गडी बाद केले. मिल्न याने जाकिर हसन, हृतय, महमदुल्लाह आणि शोरिफुल इस्लाम यांना तंबूचा रस्ता दाखवला. ट्रेंट बोल्टने 2, कोल मॅककोची 2, लोकी फर्ग्युसन 1 आणि रचिन रविंद्र याने 1 गडी बाद केला. न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्यात तीन सामन्याची वनडे मालिका आहे. पहिला सामना पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द करण्यात आला. दुसरा वनडे सामना न्यूझीलंडने 86 धावांनी जिंकला. तर तिसऱ्या सामन्यात न्यूझीलंडसमोर अवघ्या 172 धावांचं आव्हान आहे.

दोन्ही संघाचे खेळाडू

बांगलादेशचा संघ : तांझिद हसन, झाकिर हसन, नजमुल होस्सेन शांतो, तोहिद हृदय, मुश्फिकुर रहिम, महमुदुल्लाह, महेदी हसन, नसुम अहमद, हसन महमुद, शोरिफुल इस्लाम, खलेद अहमद,

न्यूझीलंडचा संघ : फिन एल्लेन, विल यंग, डीन फॉक्सक्रॉफ्ट, हेन्री निकोल्स, टॉम ब्लंडेल, रचिन रविंद्र, कोल मॅककोन्चि, एडम मिल्ने, इश सोढी, लोकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट