NZ vs BAN | महमदुल्लाहची अखेरच्या क्षणी फटकेबाजी, न्यूझीलंडसमोर 246 धावांचं आव्हान

| Updated on: Oct 13, 2023 | 6:33 PM

New Zealand vs Bangladesh | महमदुल्लाह याने अखेरच्या क्षणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर जोरदार हल्ला चढवा. त्यामुळे बांगलादेशला 240 पार मजल मारता आली. तसेच मुशफिकर रहीम यानेही चांगली खेळी केली.

NZ vs BAN | महमदुल्लाहची अखेरच्या क्षणी फटकेबाजी, न्यूझीलंडसमोर 246 धावांचं आव्हान
Follow us on

चेन्नई | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधील 11 वा सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध बांगलादेश आमनेसामने आहेत. टॉस गमावून बॅटिंग करणाऱ्या बांगलादेशने न्यूझीलंडला विजयासाठी 246 धावांचं आव्हान दिलं आहे. बांगलादेशने 50 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 245 धावा केल्या. बांगलादेशकडून अनुभवी मुश्फिकर रहिम याने सर्वाधिक 66 धावांची अर्धशतकी खेळी केली. कॅप्टन शाकिब अल हसन याने 40 धावांचं योगदान दिलं. तर अखेरीस महमदुल्लाह याने अखेरच्या काही षटकांमध्ये फटकेबाजी करत निर्णायक नॉट आऊट 41 रन्स केल्या.

महमदुल्लाह याने केल्या या तोडफोड इनिंगमुळेच बांगलादेशला 240 पार मजल मारता आली. तसेच याच खेळीमुळे 246 धावांचं सन्मानजनक आव्हान देता आलं. महमदुल्लाह याने 49 बॉलमध्ये 2 चौकार आणि 2 सिक्सच्या मदतीने या 41 धावा केल्या. मुशफिकर रहिम याने 75 बॉलमध्ये 6 चौकार आणि 2 षटकारांसह 66 धावा केल्या. शाकिब 51 बॉलमध्ये 3 फोर आणि 2 सिक्ससह 40 रन्स करुन आऊट झाला. मेहदी मिराज याने 30 धावा जोडल्या.

तांझिद हसन 16, तॉहिद हृदॉय 13 आणि तास्किन अहमद याने 17 धावा केल्या. या तिघांना सुरुवात मिळाली. मात्र टीम अडचणीत असताना या तिघांना मोठी खेळी करण्यात अपयश आलं. लिटॉस दास याला भोपळाही फोडता आला नाही. तर नजमुल हुसेन शांतो याने 7 आणि मुस्तफिजुर रहमान याने 4 धावा केल्या. तर शोरिफुल इस्माल हा महमदुल्लाह याच्यासह 2 धावांवर नाबाद परतला.

न्यूझीलंडसमोर 246 रन्सचं टार्गेट


न्यूझीलंडकडून लॉकी फर्ग्युसन याने सर्वाधिक 3 विकेट्स मिळवल्या. ट्रेन्ट बोल्ट आणि मॅट हॅनरी या दोघांनी प्रत्येकी दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर मिचेल सँटनर आणि ग्लेन फिलिप्स या दोघांच्या खात्यात 1-1 विकेट गेली.

बांग्लादेश प्लेईंग ईलेव्हन | शाकिब अल हसन (कर्णधार), लिटॉन दास, तांजीद हसन, नजमुल हुसैन शांतो, मेहदी हसन मिराज,मुश्फिकुर रहीम (विकेटकीपर), तॉहीद हृदोय, महमुदुल्लाह, तस्कीन अहमद, शोरफुल इस्लाम आणि मुस्तफिजुर रहमान

न्यूझीलंड प्लेईंग ईलेव्हन | केन विलियमसन (कॅप्टन), डेव्हॉन कॉन्वहे, रचिन रवींद्र, डेरिल मिशेल, टॉम लॅथम (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमॅन, मिचेल सँटनर, मॅट हेनरी, लॉकी फर्ग्यूसन आणि ट्रेन्ट बोल्ट.