NZ vs ENG : इंग्लंडची विजयी सुरुवात, न्यूझीलंडवर टी 20 स्टाईलने मात, 76 चेंडूमध्येच सामना जिंकला

| Updated on: Dec 01, 2024 | 10:41 AM

New Zealand vs England 1st Test Match Result : इंग्लंडने न्यूझीलंडला त्यांच्याच घरात लोळवत कसोटी मालिकेत विजयी सुरुवात केली आहे. इंग्लंडने यासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे.

NZ vs ENG : इंग्लंडची विजयी सुरुवात, न्यूझीलंडवर टी 20 स्टाईलने मात, 76 चेंडूमध्येच सामना जिंकला
Jacob Bethell and joe root nz vs eng 1st test
Image Credit source: Icc X Account
Follow us on

टीम इंडियाला घरात 3-0 ने व्हाईटवॉश देणाऱ्या न्यूझीलंडला त्यांच्याच घरात पाहुण्या इंग्लंडने पहिल्या कसोटी सामन्यातील चौथ्याच दिवशी लोळवत विजयी सलामी दिली आहे. इंग्लंडने त्यांच्या बेजबॉल स्टाईलने हा सामना जिंकत 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. इंग्लंडने हा कसोटी सामना टी 20 स्टाईलने जिंकला आहे. इंग्लंडने टॉस जिंकत यजमान न्यूझीलंडला बॅटिंगसाठी भाग पाडलं. न्यूझीलंडने केन विलियमसनच्या 93 धावांच्या मदतीने 348 धावांपर्यंत मजल मारली. इंग्लंडने प्रत्युत्तरात 499 धावा केल्या. त्यामुळे इंग्लंडला 151 धावांची मोठी आघाडी मिळाली. इंग्लंडसाठी हॅरी ब्रूकने 171 धावांची खेळी केली. तर न्यूझीलंडकडून दुसऱ्या डावात डॅरेल मिचेल (84) आणि केनने (61) धावा केल्या. त्यामुळे न्यूझीलंडचा डाव हा 254 धावांवर आटोपला. त्यामुळे इंग्लंडला 104 धावांचं आव्हान मिळालं. इंग्लंडने हे आव्हान 2 विकेट्सच्या मोबदल्यात सहज पूर्ण केलं.

इंग्लंडकडून वेगवान पाठलाग

इंग्लंडने 104 धावा झटपट गाठायचं ठरुन आक्रमक सुरुवात करायचं ठरवलं. मात्र झॅक क्रॉली दुसऱ्याच ओव्हरमध्ये आऊट झाला. मात्र बेन डकेट आणि जेकब बेथल दोघे तोडफोड आणि स्फोटक खेळले. मात्र डकेट 8 व्या षटकात 27 धावांवर बाद झाला. त्यानंतर बेथल आणि रुट या जोडीने इंग्लंडला विजयापर्यंत पोहचवलं. बेथलने 37 चेंडूमध्ये नाबाद अर्धशतक केलं. तर जो रुट 15 बॉलमध्ये 23 रन्स केल्या. इंग्लंडने अशाप्रकारे 12.4 ओव्हरमध्येच हा सामना जिंकला.

इंग्लंडची विजयी सुरुवात

न्यूझीलंड प्लेइंग ईलेव्हन : टॉम लॅथम (कॅप्टन), डेव्हॉन कॉनवे, केन विल्यमसन, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, नॅथन स्मिथ, टिम साउथी, मॅट हेन्री आणि विल्यम ओरुर्.के

इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : बेन स्टोक्स (कर्णधार), झॅक क्रॉली, बेन डकेट, जेकब बेथेल, जो रूट, हॅरी ब्रूक, ऑली पोप (विकेटकीपर), ख्रिस वोक्स, गस ऍटकिन्सन, ब्रायडन कार्स आणि शोएब बशीर.