वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीकोनातून महत्त्वाची कसोटी मालिका इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात सुरु आहे. या मालिकेकडे भारताचं लक्ष लागून आहे. कारण इंग्लंड या स्पर्धेतून आऊट झाली आहे. तर न्यूझीलंडने ही मालिका गमावली तर भारताचं अंतिम फेरीचं स्थान पक्कं होत जाईल. त्यामुळे या मालिकेकडे भारतीय क्रीडाप्रेमींच्या नजरा खिळल्या आहे. या मालिकेतील पहिला सामना क्राइस्टचर्चच्या हेगले ओवल मैदानावर होत आहे. या सामन्यात नाणेफेकीचे कौल इंग्लंडने जिंकला आणि प्रथम गोलंदाजी निवडली. फलंदाजीसाठी आलेल्या न्यूझीलंड संघाने सावध खेळी करत होम ग्राउंडचा जबरदस्त फायदा घेतला. पहिल्या दिवसावर न्यूझीलंडची मजबूत पकड दिसली. न्यूझीलंडने पहिल्या दिवसाअखेर 8 गडी बाद 319 धावा केल्या आहेत. असं असताना या सामन्यात लंच ब्रेक दरम्यान एक अनोखं चित्र पाहायला मिळालं. पहिल्या दिवशी लंच ब्रेक झाला तेव्हा प्रेक्षकांना मैदानात येण्याची सूट देण्यात आली. या सुवर्णसंधीचा फायदा शेकडो प्रेक्षकांनी घेतला आणि मैदानात धाव घेतली. एकप्रकारे संपूर्ण मैदानावर ताबा घेतला.
मैदानात उतरलेल्या काही लोकांनी क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. काही जणं सेल्फी घेण्यास मग्न झाले होते. काही वेळासाठी या मैदानावर कसोटी नाही तर पिकनिक आयोजित केल्याचं भास झाला. लंच ब्रेक पूर्ण होताच सर्व क्रीडाप्रेमी तात्काळ बाहेर गेले. तसेच पुढच्या सामन्याचा आनंद लुटू लागले. हा मजेशीर व्हिडीओ इंग्लंड क्रिकेट बोर्डाने एका कॅप्शनसह शेअर केला आहे. इंग्लंड क्रिकेटने लिहिलं की, हेगले ओवलकडून लंच ब्रेक दरम्यान क्रीडाप्रेमींना मैदानावर येण्याची परवानगी देणं हा एक चांगला प्रयोग होता.
A lovely touch from the Hagley Oval allowing fans onto the pitch during the lunch break ❤️ pic.twitter.com/LEhlEEsSIK
— England Cricket (@englandcricket) November 28, 2024
दरम्यान, न्यूझीलंडकडून दोन खेळाडू कमनशिबी ठरले. सलामीला आलेल्या टॉम लॅथमला आपलं अर्धशतक पूर्ण करता आलं नाही. त्याचा डावा 47 धावांवर आटोपला. तर केन विल्यमसनचं शतक अवघ्या 7 धावांनी हुकलं आहे. 93 धावांवर असताना गस एटकिनसनच्या चेंडूवर डॅक क्राउलेने त्याचा झेल पकडला. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ग्लेन फिलिप्स नाबाद 41, तर टिम साउदी नाबाद 10 धावांवर खेळत आहे.