इंग्लंडचा अनुभवी आणि दिग्गज फलंदाज जो रुट सुस्साट सुटलाय. रुटने कसोटी क्रिकेटमध्ये झंझावात कायम ठेवत न्यूझीलंड विरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात धमाका केला आहे. रुटने बासिन रिझर्व्ह, वेलिंग्टन येथे शानदार झंझावाती शतक खेळी केली आहे. रुटच्या कसोटी कारकीर्दीतील हे 36 वं तर 52 वं आंतरराष्ट्रीय शतक ठरलं. रुटने या शतकासह अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. रुटने अफलातून शतक ठोकण्यासाठी मोठी जोखमी घेत चौकार ठोकला. शतकाजवळ असताना भलेभले फलंदाज सावधपणे खेळतात. मात्र रुटने 83 व्या ओव्हरमधील पहिल्या बॉलवर रिव्हर्स स्कूप शॉट मारत चौकार लगावला आणि शतक पूर्ण केलं.
जो रुट गेल्या काही वर्षांपासून सातत्याने धमाकेदार शतकी खेळी करतोय. रुटचं 2021 पासूनचं हे 19 वं शतक ठरलं आहे. तर इतर फलंदाजांना रुटच्या तुलनेत 10 शतकंही करता आलेली नाहीत. न्यूझीलंडच्या केन विलियमसन याने 2021 पासून 9 तर इंग्लंडच्या हॅरी ब्रूक याने 8 शतकं ठोकली आहेत.
जो रुटने सर्वात कमी डावांमध्ये 36 वं कसोटी शतक केलं आहे. रुटने यासह दिग्गज भारतीय माजी कर्णधार राहुल द्रविड याचा विक्रम मोडीत काढला आहे. रुटने 275 व्या डावात हे शतक केलंय. तर द्रविडने 276 व्या डावात 36 वं कसोटी शतक झळकावलं होतं.तसेच सर्वात कमी डावात वेगवान 36 शतकं करण्याचा विक्रम हा ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगच्या नावावर आहे. पॉन्टिंगने 200 व्या डावातच ही कामगिरी केली होती. तर सचिनने 218 डावात ही कामगिरी केली.
जो रुटचा शतकी तडाखा
JOE ROOT IN STYLE 😮💨
What a way to bring up his century 💯
📺 Watch #NZvENG on TNT Sports and discovery+ pic.twitter.com/UOJVGBMfUi
— Cricket on TNT Sports (@cricketontnt) December 7, 2024
रिकी पॉन्टिंग : 200 डाव
कुमार संगकारा : 210 डाव
सचिन तेंडुलकर : 218 डाव
जॅक कॅलिस : 239 डाव
जो रुट : 275 डाव
राहुल द्रविड : 276 डाव
न्यूझीलंड प्लेइंग इलेव्हन : टॉम लॅथम (कर्णधार), डेव्हन कॉनवे, केन विल्यमसन, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, नॅथन स्मिथ, मॅट हेन्री, टिम साउथी आणि विल्यम ओरोर्के.
इंग्लंड प्लेइंग इलेव्हन : बेन स्टोक्स (कर्णधार), झॅक क्रॉली, बेन डकेट, जेकब बेथेल, जो रूट, हॅरी ब्रूक, ऑली पोप (विकेटकीपर), ख्रिस वोक्स, गस ऍटकिन्सन, ब्रायडन कार्स आणि शोएब बशीर.