पाकिस्तानने शान मसूद याच्या नेतृत्वात मायदेशात झालेल्या 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेत इंग्लंडवर विजय मिळवला. इंग्लंडने पहिला सामना जिंकून मालिकेत आघाडी घेतली होती. मात्र त्यानंतर निवड समितीने दुसऱ्या तिसऱ्या सामन्यासाठी संघात बदल केला आणि चमत्कार झाला. पाकिस्तानने सलग दोन्ही सामने जिंकत मालिकवेर नाव कोरलं. पाकिस्तानने 2-1 ने मालिका विजय मिळवला. पाकिस्तानने यासह 3 वर्षांनंतर मायदेशात कसोटी मालिका जिंकली. पाकिस्तान विरुद्ध मालिका गमावल्यानंतर आता इंग्लंड न्यूझीलंड विरुद्ध पुढील टेस्ट सीरिज खेळणार आहे. या मालिकेसाठी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने 16 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. इंग्लंड क्रिकेटने सोशल मीडियावरुन याबाबत माहिती दिली आहे.
बेन स्टोक्स इंग्लंडचं नेतृत्व करणार आहे. निवड समितीने पाकिस्तान विरूद्धच्या मालिकेतील खेळाडूंवरच विश्वास दाखवला आहे. मात्र फक्त 1 बदल केला आहे.जेकब बेथेल याचा समावेश केला आहे. तर विकेटकीपर बॅट्समन जेमी स्मिथ याच्या घरी लवकरच छोट्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. त्यामुळे जेमी स्मिथचा न्यूझीलंड दौऱ्यात समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे जॉर्डन कॉक्स याचा विकेटकीपर म्हणून समावेश करण्यात आला आहे.
न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड यांच्यातील 3 सामन्यांच्या मालिकेला 28 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. सलामीचा सामना हा ख्राइस्टचर्च येथे होणार आहे. दुसरा सामना हा 6 डिसेंबरपासून वेलिंग्टन येथे होईल. तर तिसरा आणि अंतिम सामना 14 डिसेंबरपासून हॅमिल्टन येथे पार पडेल. दोन्ही संघांसाठी ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलच्या हिशोबाने फार महत्त्वाची असणार आहे.
16 सदस्यीय इंग्लंड संघ जाहीर
We have named our 16-player men’s squad for our series with @BlackCaps 🏏#NZvENG | #EnglandCricket
— England Cricket (@englandcricket) October 29, 2024
पहिला सामना, 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर, ख्राईस्टचर्च.
दुसरा सामना, 6 ते 10 डिसेंबर, वेलिंग्टन.
तिसरा सामना, 14 ते 18 डिसेंबर, हॅमिल्टन.
न्यूझीलंड दौऱ्यासाठी इंग्लंड टीम : बेन स्टोक्स (कॅप्टन), रेहान अहमद, गस ऍटकिन्सन, शोएब बशीर, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, जॉर्डन कॉक्स (विकेटकीपर) , झॅक क्रॉली, बेन डकेट, जॅक लीच, ऑली पोप, मॅथ्यू पॉट्स, जो रूट, ऑली स्टोन आणि ख्रिस वोक्स.