NZ vs PAK 2nd T20i | बाबर आझमची मेहनत पुन्हा वाया, न्यूझीलंडचा सलग दुसरा विजय

| Updated on: Jan 14, 2024 | 3:38 PM

New Zealand vs Pakistan 2nd T20i Match Result |बाबर आझम याने पहिल्या सामन्याप्रमाणे दुसऱ्या सामन्यातही अर्धशतकी खेळी केली. फखर झमाननेही त्याचला चांगली साथ दिली. मात्र न्यूझीलंडनेच विजय मिळवला.

NZ vs PAK 2nd T20i | बाबर आझमची मेहनत पुन्हा वाया, न्यूझीलंडचा सलग दुसरा विजय
Follow us on

हॅमिल्टन | न्यूझीलंडने पाकिस्तानवर सलग दुसऱ्या टी 20 सामन्यात 21 धावांनी विजय मिळवला. न्यूझीलंडने या विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली आहे. न्यूझीलंडने पाकिस्तानला विजयासाठी 195 धावांचं आव्हान दिलं होतं. या धावांचा पाठलाग करताना बाबर आझम आणि फखर झमान या दोघांनी अर्धशतकी खेळी केली. मात्र दुसऱ्या बाजूने योग्य साथ न मिळाल्याने पाकिस्तानला दुसऱ्या सामन्यात 21 धावांनी पराभूत व्हावं लागलं. पाकिस्तानला 19.3 ओव्हरमध्ये ऑलआऊट 173 धावाच करता आल्या.

पाकिस्तानकडून बाबर आझम याने 43 बॉलमध्ये 7 चौकार आणि 2 सिक्सच्या मदतीने 66 धावा केल्या. तर फखर झमान 25 बॉलमध्ये 3 चौकार आणि 5 सिक्सच्या मदतीने 50 धावा ठोकून आऊट झाला. बाबर आणि फखर या दोघांनी आपली भूमिका चोखपणे पार पाडली. मात्र इतरांनी योगदान न दिल्याने पाकिस्तानला पराभूत व्हावं लागलं.

हे सुद्धा वाचा

पाकिस्तानकडून बाबर आणि फखर या दोघांव्यतिरिक्त कॅप्टन शाहिन आफ्रीदी याने 22 धावांचं योगदान दिलं. तर इतरांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. न्यूझीलंडकडून एडम मिल्ने याने 4 विकेट्स घेतल्या. तर टीम साऊथी, बेन सियर्स आणि ईश सोढी या तिघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या.

पहिल्या डावात काय झालं?

पाकिस्तानने टॉस जिंकला. कॅप्टन शाहीन आफ्रिदीने न्यूझीलंडला बॅटिंगसाठी बोलावलं. न्यूझीलंडने 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 194 धावा केल्या. न्यूझीलंडकडून फिन एलन याने सर्वाधिक 74 धावा केल्या. तर इतर फलंदाजांनीही छोटेखानी खेळी करत योगदान दिलं. कॅप्टन केन विलयमसन रिटायर्ड हर्ट झाल्याने 26 धावांवर मैदानाबाहेर गेला.

न्यूझीलंडच्या बॉलिंगसमोर पाकिस्तान ढेर

मिचेल सँटरन याने 25 धावा केल्या. डेव्हॉन कॉनव्हे याने 20 धावांचं योगदान दिलं. तर पाकिस्तानकडून हरीस रौफ याने 3 विकेट्स घेतल्या. तर अब्बास आफ्रिदीने 2 जणांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर अमिर जमाल आणि उस्मा मीर या दोघांच्या खात्यात 1-1 विकेट गेली.

न्यूझीलंड प्लेईंग ईलेव्हन | केन विल्यमसन (कर्णधार), फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे (विकेटकीपर), डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमॅन, मिचेल सँटनर, अॅडम मिल्ने, टिम साउथी, ईश सोधी आणि बेन सियर्स.

पाकिस्तान प्लेईंग ईलेव्हन | शाहीन आफ्रिदी (कॅप्टन), सैम अयुब, मोहम्मद रिझवान, बाबर आझम, फखर जमान, इफ्तिखार अहमद, आझम खान (विकेटकीपर), आमेर जमाल, उसामा मीर, अब्बास आफ्रिदी आणि हरिस रौफ.