ऑकलंड | टीम इंडियाचे कट्टर आणि पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान क्रिकेट टीमची पराभवाची ‘मालिका’ सुरुच आहे. ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला कसोटी मालिकेत व्हाईट वॉश दिला. त्यानंतर आता पाकिस्तान न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. नव्या कर्णधाराच्या नेतृत्वात पाकिस्तान न्यूझीलंड विरुद्ध टी सीरिज खेळत आहे. ही एकूण 5 सामन्यांची मालिका आहे. शाहिन आफ्रिदीकडे टी 20 सीरिजचं नेतृत्व देण्यात आलं आहे.
पाकिस्तान या मालिकेत 2-0 अशा फरकाने पिछाडीवर आहे. न्यूझीलंडने पाकिस्तानला सलग पहिल्या 2 सामन्यात पराभवाची धुळ चारली. या दोन्ही सामन्यात विजयी धावांचा पाठलाग करताना माजी कर्णधार बाबर आझम याने टीमला जिंकवण्याचा जोरदार प्रयत्न केला. मात्र त्याला दुसऱ्या बाजूने हवी तशी साथ मिळाली नाही. त्यामुळे बाबरच्या अर्धशतकी खेळीनंतरही पाकिस्तानला पराभूत व्हावं लागलं.
आता मालिकेतील तिसरा सामना हा बुधवारी 17 जानेवारी रोजी होणार आहे. मालिकेच्या दृष्टीने हा सामना पाकिस्तानसाठी आर या पार असा आहे. पाकिस्तानला मालिकेतील आव्हान कायम ठेवायचं असेल, तर तिसरा सामना कोणत्याही परिस्थितीत सामना जिंकावाच लागेल. तर दुसऱ्या बाजूला न्यूझीलंड विजयाची हॅटट्रिक पूर्ण करुन मालिका विजयासाठी सज्ज आहे. त्यामुळे आता तिसऱ्या सामन्यात काय निकाल लागतो, याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे.
📸 Dunedin diaries
Levelling up for the next T20I against New Zealand 🏏#NZvPAK | #BackTheBoysInGreen pic.twitter.com/zKrBOGOKhY
— Pakistan Cricket (@TheRealPCB) January 16, 2024
दरम्यान पाकिस्तान क्रिकेट टीमने तिसऱ्या सामन्यासाठी जोरदार सराव केला आहे. खेळाडूंना नेट्समध्ये घाम गाळला आहे. तिसऱ्या सामन्यासाठी तयारी केली आहे. पाकिस्तान क्रिकेटने सरावाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
टी 20 सीरिजसाठी टीम पाकिस्तान | आमेर जमाल, शाहीन अफ्रीदी (कर्णधार), सैम अयूब, मोहम्मद रिजवान, बाबर आझम, फखर जमान, इफ्तिखार अहमद, आजम खान (विकेटकीपर), उसामा मीर, अब्बास अफरीदी, हारिस रऊफ, मोहम्मद नवाज, अबरार अहमद, साहिबजादा फरहान, मोहम्मद वसीम जूनियर, हसीबुल्लाह खान आणि जमान खान.
न्यूझीलंड टीम | फिन एलन, डेवोन कॉनव्हे (विकेटकीपर), विल यंग, डेरिल मिचेल, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमॅन, मिचेल सेंटनर, एडम मिल्ने, टीम साउथी, ईश सोढी, बेन सियर्स, मॅट हेनरी आणि टीम सायफर्ट.