आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील साखळी फेरीतून बाहेर पडलेल्या पाकिस्तान क्रिकेट टीमची न्यूझीलंड दौऱ्यातही हारकिरी कायम आहे. पाकिस्तान क्रिकेट टीम सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. पाकिस्तान न्यूझीलंडविरुद्ध टी 20i मालिका खेळत आहे. उभयसंघात एकूण 5 टी 20i सामने खेळवण्यात येणार आहेत. न्यूझीलंडने पहिले दोन्ही सामने जिंकून मालिकेत 2-0 अशी एकतर्फी आघाडी घेतलेली आहे. त्यामुळे पाकिस्तानला मालिकेतील आव्हान कायम राखायचं असेल तर तिसऱ्या सामन्यात कोणत्याही स्थितीत विजय मिळवावा लागणार आहे.
उभयसंघातील टी 20i मालिकेला 16 मार्चपासून सुरुवात झाली. न्यूझीलंडने सलामीच्या सामन्यात एकतर्फी विजय मिळवला. न्यूझीलंडने पाकिस्तानला 91 धावांवर गुंडाळलं. त्यानंतर 92 धावांचं आव्हान हे 61 बॉलमध्ये 1 विकेट गमावून पूर्ण केलं. त्यानंतर दुसरा सामना मंगळवारी 18 मार्चला खेळवण्यात आला. पावसामुळे हा सामना 15 ओव्हरचा करण्यात आला. पाकिस्तानने समाधानकराक बॅटिंग करत 15 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 135 धावा केल्या. मात्र न्यूझीलंडच्या फलंदाजांनी पाकिस्तानच्या गोलंदाजांची धुलाई करत विजयी आव्हान हे 11 चेंडू राखून पूर्ण केलं. न्यूझीलंडने 13.1 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 137 धावा केल्या. न्यूझीलंडने अशाप्रकारे सलग दुसरा विजय मिळवला. किवींनी यासह मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली.
पाकिस्तानने सलग 2 सामने गमावेलत. आता मालिकेत आव्हान कायम ठेवायचं असेल तर किमान तिसरा सामना तरी जिंकावा लागणार आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या खेळाडूंचा तिसर्या सामन्यात चांगलाच कस लागणार आहे. उभयसंघातील तिसरा सामना हा शुक्रवारी 21 मार्चला खेळवण्यात येणार आहे.
पाकिस्तान क्रिकेट टीम : सलमान आगा (कर्णधार), मोहम्मद हरीस (विकेटकीपर), हसन नवाज, इरफान खान, शादाब खान, खुशदिल शाह, अब्दुल समद, जहंदाद खान, शाहीन आफ्रिदी, अबरार अहमद, मोहम्मद अली, ओमेर युसूफ, हारिस रौफ, अब्बास आफ्रिदी, उस्मान खान आणि सुफियान मुकेम.
न्यूझीलंड क्रिकेट टीम : मायकेल ब्रेसवेल (कर्णधार), टीम सायफर्ट, फिन ऍलन, टिम रॉबिन्सन, मार्क चॅपमन, डॅरिल मिशेल, मिशेल हे (विकेटकीपर), झॅकरी फॉल्केस, कायल जेमिसन, ईश सोधी, जेकब डफी, जेम्स नीशम, बेन सीयर्स आणि विल्यम किंवा विल्यम.