NZ vs PAK | टी 20 सीरिजसाठी पाकिस्तान आणि न्यूझीलंड टीम, कॅप्टन कोण?

| Updated on: Jan 08, 2024 | 10:11 PM

New Zealand vs Pakistan T20i Series | न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान यांच्यात एकूण 5 सामन्यांची टी 20 मालिका होणार आहे. अवघ्या काही महिन्यांवर टी 20 वर्ल्ड कप आहे. त्यामुळे टी 20 मालिका दोन्ही संघांसाठी महत्त्वाची आहे.

NZ vs PAK | टी 20 सीरिजसाठी पाकिस्तान आणि न्यूझीलंड टीम, कॅप्टन कोण?
Follow us on

मुंबई | पाकिस्तानला ऑस्ट्रेलियाने 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 3-0 ने व्हाईट वॉश दिला. पाकिस्तानला एकाही सामन्यात हवी तशी लढत देता आली नाही. पाकिस्तान आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर न्यूझीलंड दौरा करणार आहे. पाकिस्तान या दौऱ्यात न्यूझीलंड विरुद्ध 5 सामन्यांची टी 20 मालिका खेळणार आहे. दोन्ही संघांसाठी टी 20 वर्ल्ड कपच्या हिशोबाने ही मालिका फार निर्णायक अशी आहे. या मालिकेसाठी पाकिस्तानचं कर्णधार आणि उपकर्णधारपद कोणाला देण्यात आलंय? मालिकेला केव्हापासून सुरुवात होणार हे आपण जाणून घेऊयात.

शाहिन शाह अफ्रिदी याला न्यूझीलंड विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर मोहम्मद रिझवान याला उपकर्णधारपदी बढती देण्यात आली आहे. टी 20 मालिकेला शुक्रवार 12 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. तर पाचवा आणि अंतिम सामना हा रविवारी 21 जानेवारी रोजी पार पडेल.

हे सुद्धा वाचा

टी 20 सीरिजचं वेळापत्रक

पहिला सामना, शुक्रवार 12 जानेवारी, ईडन पार्क, ऑकलंड.

दुसरा सामना, रविवार 14 जानेवारी, हॅमिल्टन.

तिसरा सामना, बुधवार 17 जानेवारी, दुनेडिन.

चौथा सामना, शुक्रवार 19 जानेवारी, ख्राईस्टचर्च.

पाचवा सामना, रविवार 21 जानेवारी, ख्राईस्टचर्च.

टी 20 सीरिजसाठी न्यूझीलंड टीममध्ये कोण कोण?

न्यूझीलंड विरुद्धच्या टी 20 सीरिजसाठी पाकिस्तान टीम | शाहीन शाह अफरीदी (कर्णधार), मोहम्मद रिजवान (उपकर्णधार), आमेर जमाल, अब्बास अफरीदी, आजम खान (विकेटकीपर), बाबर आजम, फखर जमां, हारिस रऊफ, हसीबुल्लाह (विकेटकीपर), इफ्तिखार अहमद, मोहम्मद नवाज, मोहम्मद वसीम जूनियर, सईम अयूब, उसामा मीर, जमान खान आणि साहिबजादा फरहान.

न्यूझीलंड टीम | केन विलियमसन (कॅप्टन- तिसऱ्या सामन्याचा अपवाद वगळता) फिन एलन, टिम सिफर्ट (विकेटकीपर), डेवान कॉनवे (विकेटकीपर), डेरिल मिचेल, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमॅन, जोश क्लार्कसन (फक्त तिसऱ्या सामन्यासाठी), मिचेल सेंटनर, मॅट हेनरी, एडम मिल्ने, ईश सोढी, टीम साउथी, बेन सिअर्स (पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यासाठी) आणि लॉकी फर्ग्यूसन (शेवटच्या 3 सामन्यासाठी).