हॅमिल्टन | न्यूझीलंड क्रिकेट टीमचा दिग्गज फलंदाज केन विलियमसन याने इतिहास रचला आहे. केनने दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात शतक ठोकत महारेकॉर्ड केला आहे. न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेवर 7 विकेट्सने विजय मिळवला. न्यूझीलंडने अशाप्रकारे दक्षिण आफ्रिकेचा 2-0 असा व्हाईटवॉश केला. केनने दक्षिण आफ्रिके विरुद्ध दुसऱ्या डावात खणखणीत शतकी खेळी केली. केनने 260 बॉलमध्ये नाबाद 133 धावांची विजयी खेळी केली.
केन विलियमनस याने कसोटी क्रिकेटमध्ये वेगवान 32 शतक ठोकण्याचा कारनामा केलाय. केनने यासह स्टीव्हन स्मिथ, रिकी पॉन्टिंग आणि सचिन तेंडुलकर यासारख्या दिग्गजांना मागे टाकलं. केनने 172 व्या डावात 32 वं कसोटी शतक पूर्ण केलं. तर स्टीव्हन स्मिथला 32 व्या शतकासाठी 174, रिकी पॉन्टिंग याला 176 आणि सचिन तेंडुलकरला 179 डावांपर्यंत प्रतिक्षा करावी लागली होती.
यूनुस खान, पाकिस्तान, 193 डाव
सचिन तेंडुलकर, टीम इंडिया, 179 डाव
रिकी पाँटिंग, ऑस्ट्रेलिया, 176 डाव
स्टीव्हन स्मिथ, ऑस्ट्रेलिया, 174 डाव
केन विलियमसन, न्यूझीलंड, 172 डाव.
केनने न्यूझीलंडच्या विजयात सर्वात जास्त योगदान दिलं. तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंगसाठी आलेल्या केनने अखेरपर्यंत नाबाद राहत टीमला विजयी केलं. केनने 260 बॉलमध्ये 51.15 च्या स्ट्राईक रेटने 2 सिक्स आणि 12 खणखणीत चौकारांच्या मदतीने 133 धावा केल्या. न्यूझीलंडने अशाप्रकारे दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या कसोटी मालिकेची सांगता ही विजयाने केली.
केनचं विक्रमी वेगवान 32 वं शतक
Kane Williamson has reached his 32nd Test Century! With 172 innings, that is the fewest innings to reach 32 test 100’s in test history, beating Steve Smith. 🔥🏏@BLACKCAPS v South Africa: 2nd Test | LIVE on DUKE and TVNZ+ pic.twitter.com/pSg5VFP2nS
— TVNZ+ (@TVNZ) February 16, 2024
केनने दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील हे तिसरं शतक ठरलं. केनने या मालिकेत दक्षिण आफ्रिके विरुद्ध अनुक्रमे 118, 109, 43 आणि आता 133* अशा धावा केल्या. केनने केलेल्या या कामगिरीसाठी त्याला ‘मॅन ऑफ द सीरिज’ या पुरस्काराने गौरवण्यात आलं.
न्यूझीलंड प्लेईंग ईलेव्हन | टीम साऊथी (कॅप्टन), टॉम लॅथम, डेव्हॉन कॉनवे, केन विल्यमसन, रचिन रवींद्र, विल यंग, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मॅट हेन्री, नील वॅगनर आणि विल्यम ओरर्के.
दक्षिण आफ्रिका प्लेईंग ईलेव्हन | नील ब्रँड (कर्णधार), क्लाईड फोर्टुइन (विकेटकीपर), रेनार्ड व्हॅन टोंडर, झुबेर हमझा, डेव्हिड बेडिंगहॅम, कीगन पीटरसन, रुआन डी स्वार्ड, शॉन वॉन बर्ग, डेन पिएड, त्शेपो मोरेकी आणि डेन पॅटरसन.