NZ vs SA Toss | न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिका विरुद्ध टॉस जिंकला, प्लेईंग ईलेव्हनमध्ये कोण?

| Updated on: Nov 01, 2023 | 2:06 PM

New Zealand vs South Africa Toss | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये आज क्रिकेट चाहच्यांना अटीतटीचा आणि चुरशीचा सामना पाहायला मिळणार आहे. या सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका एकमेकांसमोर आहेत.

NZ vs SA Toss | न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिका विरुद्ध टॉस जिंकला, प्लेईंग ईलेव्हनमध्ये कोण?
Follow us on

पुणे | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधील 32 वा सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका आमनेसामने आहेत. या सामन्याचं आयोजन हे पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. सामन्याला दुपारी 2 वाजता सुरुवात होणार आहे. तर त्याआधी 1 वाजून 30 मिनिटांनी टॉस पार पडला. न्यूझीलंड टीमने टॉस जिंकलाय. कॅप्टन टॉम लॅथम याने फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. टीम इंडियानंतर दोन्ही संघ हे सेमी फायनलसाठी प्रबळ दावेदार आहेत. त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा सामना सेमी फायनलच्या हिशोबाने अत्यंत महत्त्वाचा आहे.

पॉइंट्स टेबलमध्ये कोण कुठे?

न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांचा या वर्ल्ड कपमधील हा सातवा सामना आहे. दक्षिण आफ्रिकाने 6 पैकी 5 सामने जिंकले आहेत. दक्षिण आफ्रिका 10 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर न्यूझीलंडने 6 पैकी 4 सामने जिंकले आहेत. न्यूझीलंड 8 पॉइंट्ससोबत तिसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे. या दोन्ही संघांना सेमी फायनलमध्ये पोहचण्यासाठी हा सामना अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे दोन्ही संघ जोमाने सामन्यात दोन हात करणार आहेत.

दोन्ही टीमच्या प्लेईंग ईलेव्हनमध्ये बदल

दरम्यान या निर्णायक सामन्यासाठी न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका दोन्ही संघांनी प्लेईंग ईलेव्हनमध्ये बदल केले आहेत. न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका टीमने प्लेईंग ईलेव्हनमध्ये प्रत्येकी 1-1 बदल केला आहे. न्यूझीलंड प्लेईंग ईलेव्हनमध्ये टीम साऊथी याचं कमबॅक झालं आहे. त्यामुळे लॉकी फर्ग्यूसन याला बाहेर बसवण्यात आलं आहे. तर तरबेज शम्सी याला बाहेरचा रस्ता दाखवून कगिसो रबाडा याचा दक्षिण आफ्रिका प्लेईंग ईलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे.

न्यूझीलंडचे खेळाडू दुखापतीच्या कचाट्यात

न्यूझीलंड प्लेईंग ईलेव्हन | टॉम लॅथम (कॅप्टन आणि विकेटकीपर), डेव्हॉन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिचेल, ग्लेन फिलिप्स, जेम्स नीशम, मिचेल सँटनर, मॅट हेन्री, टीम साउथी आणि ट्रेंट बोल्ट.

दक्षिण आफ्रिका प्लेईंग ईलेव्हन | टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रॅसी व्हॅन डेर ड्युसेन, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅनसेन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज, कागिसो रबाडा आणि लुंगी एन्गिडी.