मुंबई : न्यूझीलंडने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत दक्षिण अफ्रिकेला क्लिन स्वीप दिला आहे. दोन सामन्यांची मालिका 2-0 ने जिंकत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील आपलं अव्वल स्थान कायम ठेवलं आहे. दुसरीकडे, दक्षिण अफ्रिकेला न्यूझीलंडमध्ये दुय्यम संघ पाठवणं महागात पडलं आहे. मालिका 2-0 ने गमावल्याने गुणतालिकेत मोठा फटका बसला आहे. मुख्य खेळाडू दक्षिण अफ्रिकेत टी20 लीग खेळण्यात व्यस्त असताना न्यूझीलंडने डाव साधला. दक्षिण अफ्रिकेने न्यूझीलंड दौऱ्यासाठी जेव्हा संघ निवडला तेव्हाच ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह वॉने टीकास्त्र सोडलं होतं. आता त्याचं भाकीत खरं ठरलं आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण अफ्रिकेने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फंलदाजी स्वीकारली. तसेच पहिल्या डावात सर्वबाद 242 धावा केल्या. तसेच न्यूझीलंड 211 धावांवर रोखत पहिल्या डावात 31 धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या डावात दक्षिण अफ्रिकेने 235 धावा केल्या आणि विजयासाठी 266 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान न्यूझीलंड 3 गडी गमवून पूर्ण केलं. तसेच दक्षिण अफ्रिकेवर 7 गडी राखून विजय मिळवला.
दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत सर्वोत्तम कामगिरी केल्याप्रकरणी विल्यम ओरोर्के याला मालिकावीराचा पुरस्काराने गौरविण्यात आलं . तर दुसऱ्या कसोटी सामन्यात शतकी खेळी करणाऱ्या केन विल्यमसनला सामनावीराचा पुरस्काराने गौरविण्यात आलं. केन विल्यमसनने दुसऱ्या डावात 260 चेंडूंचा सामना केला आणि नाबाद 133 धावा केल्या. तर विल यंगने 134 चेंडूत 60 धावा करत न्यूझीलंडला विजय मिळवून दिला. दुसऱ्या दक्षिण अफ्रिकेचा डेन पायडिट वगळता एकाही गोलंदाजाला यश मिळालं नाही. त्याने 3 गडी बाद केले.
दक्षिण अफ्रिका संघात सात अनकॅप्ड खेळाडूंना स्थान मिळाले होते. कर्णधारपदाची जबाबदारीही एका अनकॅप्ड खेळाडूकडे सोपवण्यात आली होती. तर दक्षिण आफ्रिकेचे मोठे खेळाडू देशांतर्गत टी20 लीगमध्ये सहभागी झाले. न्यूझीलंड दौऱ्यासाठी दक्षिण आफ्रिकेने असा हलका संघ पाठवल्याबद्दल ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह वॉने नाराजी व्यक्त केली होती.
न्यूझीलंड प्लेइंग इलेव्हन : टीम साऊथी (कॅप्टन), टॉम लॅथम, डेव्हॉन कॉनवे, केन विल्यमसन, रचिन रवींद्र, विल यंग, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मॅट हेन्री, नील वॅगनर आणि विल्यम ओरर्के.
दक्षिण आफ्रिका प्लेइंग इलेव्हन : नील ब्रँड (कर्णधार), क्लाईड फोर्टुइन (विकेटकीपर), रेनार्ड व्हॅन टोंडर, झुबेर हमझा, डेव्हिड बेडिंगहॅम, कीगन पीटरसन, रुआन डी स्वार्ड, शॉन वॉन बर्ग, डेन पिएड, त्शेपो मोरेकी आणि डेन पॅटरसन.