NZ vs SL : 12 बॉल 48 रन्स, विलं यंगची धमाकेदार खेळी, श्रीलंकेचा 9 विकेट्सने धुव्वा, न्यूझीलंडची विजयी सुरुवात

| Updated on: Jan 05, 2025 | 12:32 PM

New Zealand vs Sri Lanka 1st Odi Match Result : न्यूझीलंडने विल यंगच्या तडाखेदार खेळीच्या जोरावर श्रीलंकेचा पहिल्या एकदिवसीय सामन्यात 9 विकेट्सने धुव्वा उडवला आहे.

NZ vs SL : 12 बॉल 48 रन्स, विलं यंगची धमाकेदार खेळी, श्रीलंकेचा 9 विकेट्सने धुव्वा, न्यूझीलंडची विजयी सुरुवात
rachin ravindra and will young
Image Credit source: blackcaps x account
Follow us on

विल यंग याच्या झंझावाती खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने नववर्षात विजयी सुरुवात केली आहे. न्यूझीलंडने श्रीलंकेवर पहिल्या एकदिवसीय सामन्यात 9 विकेट्सने धमाकेदार विजय मिळवला आहे. श्रीलंकने न्यूझीलंडला विजयासाठी 179 धावांचं आव्हान दिलं होतं. न्यूझीलंडने हे आव्हान 26.2 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून पूर्ण केलं. न्यूझीलंडने या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. विल यंग याने न्यूझीलंडसाठी सर्वाधिक आणि नाबाद 90 धावा केल्या. यंगला त्याच्या या कामगिरीसाठी ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्काराने गौरवण्यात आलं.

न्यूझीलंडची बॅटिंग

विल यंग आणि रचीन रवींद्र या सलामी जोडीने विजयी धावांचा पाठलाग करताना शानदार सुरुवात केली. या सलामी जोडीने 93 धावांची भागीदारी केली. त्यानंतर रचीन रवींद्र आऊट झाला. रचीनने 36 बॉलमध्ये 1 सिक्स आणि 6 फोरसह 45 रन्स केल्या. त्यानंतर विल आणि मार्क चॅपमॅन या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 87 धावांची नाबाद आणि विजयी भागीदारी केली. विल यंग याने 86 बॉलमध्ये 12 फोरसह नॉट आऊट 90 रन्स केल्या. तर चॅपमॅन याने 36 चेंडूत 3 फोरसह नॉट आऊट 29 रन्स केल्य.

पहिल्या डावात काय झालं?

त्याआधी न्यूझीलंडने टॉस जिंकत श्रीलंकेला बॅटिंगसाठी भाग पाडलं. मात्र श्रीलंकेच्या चौघांचा अपवाद वगळता इतरांपैकी एकालाही दुहेरी आकडा गाठता आला नाही. इतकंच काय तर श्रीलंकेला 50 ओव्हरही खेळता आलं नाही. श्रीलंकेचा डाव 43.4 ओव्हरमध्ये 178 रन्सवर आटोपला. ओपनर अविष्का फर्नांडो याने सर्वाधिक 56 रन्स केल्या. जनिथ लियानगे आणि वानिंदु हसरंगा या दोघांनी अनुक्रमे 36 आणि 35 अशा धावा केल्या. तर चामिंदु विक्रमसिंघेने 22 रन्स केल्या. तर इतर फलंदाज फ्लॉप ठरले.

न्यूझीलंडची विजयी सलामी

न्यूझीलंडकडून मॅट हॅन्रीने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. जेकब डफी आणि नॅथन स्मिथ या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर कॅप्टन मिचेल सँटनरने 1 विकेट घेतली. दरम्यान मालिकेतील दुसरा आणि निर्णायक सामना हा 8 जानेवारीला होणार आहे.

न्यूझीलंड प्लेइंग इलेव्हन: मिचेल सँटनर (कर्णधार), विल यंग, ​​रचिन रवींद्र, मार्क चॅपमन, डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मिशेल हे (विकेटकीपर), नॅथन स्मिथ, मॅट हेन्री, जेकब डफी आणि विल्यम ओरर्के.

श्रीलंका प्लेइंग इलेव्हन: चरित असलंका (कर्णधार), पथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस (विकेटकीपर), कामिंदू मेंडिस, जेनिथ लियानागे, चामिंडू विक्रमसिंघे, वानिंदू हसरंगा, लाहिरू कुमारा, एशान मलिंगा आणि असिथा फर्नांडो.