यॉर्कर टाकला की काय..! नुवान तुषाराचा चेंडू समजण्याच्या आतच खेळाडूचा त्रिफळा उडला Watch Video

| Updated on: Nov 10, 2024 | 10:32 PM

श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या टी20 सामन्यात गोलंदाजांचा कहर दिसला. श्रीलंकेच्या गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी केली. त्यामुळे न्यूझीलंडला फक्त 108 धावांपर्यंत मजल मारता आली. या सामन्यात नुवान तुषाराने टाकलेल्या चेंडूची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

यॉर्कर टाकला की काय..! नुवान तुषाराचा चेंडू समजण्याच्या आतच खेळाडूचा त्रिफळा उडला Watch Video
Follow us on

न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात श्रीलंकेच्या गोलंदाजांनी भेदक गोलंदाजीचं प्रदर्शन केलं. दुसरा सामना दांबुलच्या रांगिरी आंतरराष्ट्रीय मैदानात खेळला गेला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर श्रीलंकेने पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडचे फलंदाज 20 षटकंही पूर्ण खेळू शकले नाही. 19.3 षटकात सर्व खेळाडू बाद होत तंबूत परतले. पहिल्याच चेंडूवर श्रीलंकेने न्यूझीलंडला बॅकफूटवर ढकललं. त्यानंतर न्यूझीलंडच्या फलंदाजांना डोकं वर काढता आलं नाही. नुवान तुषाराने 4 षटकं टाकली आमि 5.50 च्या इकोनॉमी रेटने 22 धावा दिल्या. तसेच दोन गडी बाद केले. न्यूझीलंडकडून टिम रॉबिन्सन आणि विल यंग ही जोडी मैदानात उतरली होती. श्रीलंकेकडून पहिलं षटक टाकण्यासाठी नुवान तुषाराला पाचारण करण्यात आलं.

नुवान तुषाराने पहिल्याच चेंडूवर टिम रॉबिन्सनच्या दांड्या उडवल्या. चेंडू इतका भेदक होता की त्याला काही कळलंच नाही. काही क्षण तर त्याला विचार करण्यात गेला की काय चेंडू टाकली की काय.. इतक्या वेगाने चेंडू निघून गेला की त्याला शब्दच फुटले नाहीत. नुवान तुषाराने टाकलेला चेंडूचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

नुवान तुषाराच्या भेदक गोलंदाजीची सर्वत्र चर्चा होत आहे. त्याची शैली बरोबर लसिथ मलिंगासारखी आहे. त्याने 2022 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतून पदार्पण केलं होतं. आयपीएल 2024 मिनी लिलावात 4.8 कोटी रुपये देऊन संघात घेतलं आहे. यावेळी मेगा लिलावात नुवान तुषाराचा भाव वधारलेला असेल.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

न्यूझीलंड (प्लेइंग इलेव्हन): टिम रॉबिन्सन, विल यंग, ​​मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिच हे (विकेटकीपर), जोश क्लार्कसन, मिचेल सँटनर (कर्णधार), ईश सोधी, झकरी फौल्केस, लॉकी फर्ग्युसन.

श्रीलंका (प्लेइंग इलेव्हन): पाथुम निसांका, कुसल मेंडिस (विकेटकीपर), कुसल परेरा, कामिंदू मेंडिस, चरिथ असलंका (कर्णधार), भानुका राजपक्षे, वानिंदू हसरंगा, दुनिथ वेललागे, महेश थेक्षाना, मथीशा पाथिराना, नुवान तुषारा