मुंबई | टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशा फरकाने पराभव केला. त्यानंतर 17 मार्चपासून मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये 3 क्रिकेट मॅचच्या वनडे सीरिजला सुरुवात झाली. या मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर 5 विकेट्स शानदार विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. दुसरा सामना हा 19 मार्च रोजी विशाखापट्टणम येथे खेळवण्यात आला. टीम इंडियाने पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाची दाणादाण उडवून 188 धावांवर ऑलआऊट केलं होतं. ऑस्ट्रेलियाने त्याचप्रमाणे दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाला अवघ्या 117 धावांवर ऑलआऊट करत परतफेड केली. यानंतर ट्रेव्हिस हेड आणि मिचेल मार्श या सलामी जोडीनेच 118 धावांचं आव्हान पूर्ण केलं. अशा प्रकारे ऑस्ट्रेलियाने टीम इंडियावर 10 विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह या वनडे सीरिजमध्ये 1-1 ने बरोबरी साधली आहे.
टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाकडून लाजीरवाणा पराभव स्वीकारावा लागला. तसेच ऑस्ट्रेलियाने भारतात टीम इंडियावर 234 चेंडू राखून विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाच्या सलामी जोडीने अवघ्या 11 ओव्हरमध्ये विजयी आव्हान पूर्ण केलं. अशा प्रकारे कोणत्याही संघाने टीम इंडियावर भारतात चेंडूच्या फरकाने जिंकलेला हा मोठा विजय ठरला. या मालिकेतील निर्णायक तिसरा आणि शेवटचा सामना हा बुधवारी 22 मार्च रोजी खेळवण्यात येणार आहे. त्याआधी क्रिकेट विश्वातून मोठी आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे.
दुसऱ्या सामन्यात झालेल्या निराशाजनक पराभवामुळे कॅप्टनने आता कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. स्वत:कॅप्टनने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. यामुळे क्रिकेट विश्वात एकच खळबळ उडाली आहे. तसेच क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
श्रीलंकेला पहिल्या सामन्यानंतर दुसऱ्या सामन्यातही पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. न्यूझीलंडने श्रीलंकेवर दुसऱ्या कसोटी सामन्यात एक डाव आणि 58 धावांनी विजय मिळवला. या विजयासह श्रीलंकेला व्हाईट वॉश केला. न्यूझीलंडने ही मालिका 2-0 च्या फरकाने जिंकली. याआधी थरारक झालेल्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने 2 विकेट्सने विजय मिळवला.
आता या कसोटी मालिकेतील पराभवानंतर श्रीलंकेचा कर्णधार दिमुथ करुणारत्ने याने कर्णधारपद सोडणार असल्याचं जाहीर केलं आहे. दिमुथने याबाबत ट्विट केलं आहे. दिमुथने आयर्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर कर्णधारपद सोडणआर असल्याचं म्हटलं आहे.
दिमुथने आपल्या जागी कर्णधार शोधावा, असं टीम मॅनेजमेंटला सांगितंल आहे. मात्र दिमुथच्या या निर्णयाबाबत टीम मॅनेजमेंटकडून कोणतीही प्रतिक्रिया किंवा भूमिका मांडण्यात आलेली नाही. यामुळे टीम मॅनेजमेंट आता काय निर्णय घेतं, याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे.