NZ vs SL 3rd Odi : श्रीलंकेची टी 20I नंतर वनडेतही तशीच स्थिती, पुन्हा क्लीन स्वीपची टांगती तलवार

| Updated on: Jan 10, 2025 | 10:53 PM

न्यूझीलंड श्रीलंकेविरुद्धच्या 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहे. न्यूझीलंडने ही मालिका आधीच जिंकली आहे. त्यामुळे न्यूझीलंडला तिसऱ्या सामन्यात विजयी हॅटट्रिकची संधी आहे. तर श्रीलंकेसमोर दौऱ्याचा शेवट विजयाने करण्याचं आव्हान आहे.

NZ vs SL 3rd Odi : श्रीलंकेची टी 20I नंतर वनडेतही तशीच स्थिती, पुन्हा क्लीन स्वीपची टांगती तलवार
new zealand vs sri lanka odi series
Image Credit source: blackcaps x account
Follow us on

न्यूझीलंड दौऱ्यावर असलेल्या श्रीलंका क्रिकेट संघाची टी 20i मालिकेनंतर वनडेतही बिकट आणि तशीच स्थिती झाली आहे. न्यूझीलंडने श्रीलंकेला 3 टी 20i सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या 2 मॅचमध्ये पराभूत करत मालिका खिशात घातली. सलग 2 सामने गमावल्याने श्रीलंका मालिकेत 0-2 ने पिछाडीवर होती. मात्र श्रीलंकेने तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात विजय मिळवला आणि मालिकेचा शेवट गोड केला. त्यानंतर यजमान न्यूझीलंडने अनुक्रमे 5 आणि 8 जानेवारीला सलग 2 सामन्यात श्रीलंकेला लोळवत वनडे सीरिजही जिंकली. न्यूझीलंडने अशाप्रकारे मालिकेत टी 20i प्रमाणे वनडेतही 2-0 ने आघाडी घेतली. आता शनिवारी तिसरा आणि अंतिम एकदिवसीय सामना होणार आहे.

हा अंतिम सामना इडन पार्क, ऑकलँड येथे होणार आहे. सामन्याला भारतीय वेळेनुसार सकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. श्रीलंकेसमोर या तिसर्‍या सामन्यात यजमानांवर मात करत न्यूझीलंडला विजयी हॅटट्रिक करण्यापासून रोखण्याचं दुहेरी आव्हान आहे. तर न्यूझीलंड श्रीलंकेचा 0-3 ने सुपडा साफ करण्याच्या तयारीने मैदानात उतरणार आहे. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात कोण विजयी होतो? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

दरम्यान श्रीलंका या मालिकेनंतर मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. उभयसंघांची ही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्शीप 2023-2025 या साखळीतील शेवटची मालिका असणार आहे. तर दुसऱ्या बाजूला न्यूझीलंड पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ट्राय सीरिजमध्ये भिडणार आहे.

न्यूझीलंड क्रिकेट टीम : मिशेल सँटनर (कॅप्टन), विल यंग, ​​रचीन रवींद्र, मार्क चॅपमन, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, नॅथन स्मिथ, मॅट हेन्री, जेकब डफी, विल्यम ओरोरके, मिचेल हे आणि मायकेल ब्रेसवेल.

श्रीलंका क्रिकेट टीम : चरिथ असलंका (कर्णधार), पाथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस (विकेटकीपर), कामिंदू मेंडिस, जेनिथ लियानागे, चामिंडू विक्रमसिंघे, वानिंदू हसरंगा, महेश थेक्षाना, एशान मलिंगा, असिथा फर्नांडो, नुवानिद फर्नांडो, निवानिद फर्नांडो, नुवानिद फर्नांडो वेललागे, मोहम्मद शिराझ, लाहिरू कुमारा आणि जेफ्री वँडरसे.