NZ vs SL : तिसरा आणि अंतिम सामना शनिवारी, कुठे पाहता येणार मॅच?

| Updated on: Jan 10, 2025 | 10:15 PM

New Zealand vs Sri Lanka 3rd Odi Live Streaming : न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका यांच्यात एकदिवसीय मालिका खेळवण्यात येत आहे. मालिकेतील तिसरा सामना हा शनिवारी खेळवण्यात येत आहे.

NZ vs SL : तिसरा आणि अंतिम सामना शनिवारी, कुठे पाहता येणार मॅच?
new zealand vs sri lanka
Follow us on

न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका यांच्यात एकदिवसीय मालिका खेळवण्यात येत आहे. श्रीलंका या मालिकेसाठी न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. उभयसंघात या एकदिवसीय मालिकेआधी टी 20I मालिका पार पडली. न्यूझीलंडने ही मालिक 2-1 अशा फरकाने जिंकली. त्यानंतर न्यूझीलंडने बुधवारी 8 जानेवारीला सलग दुसरा सामना जिंकून सलग दुसरी मालिकाही जिंकली. न्यूझीलंडने या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली. श्रीलंकेने टी 20I मालिकेत तिसरा सामना जिंकत क्लीन स्वीपने होणारा लाजीरवाणा पराभव टाळला. आता त्यानंतर पुन्हा श्रीलंकेवर क्लीन स्वीपची टांगती तलवार आहे. अशात तिसऱ्या सामन्याचा निकाल काय लागतो? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.

न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका तिसरा एकदिवसीय सामना केव्हा?

न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका तिसरा एकदिवसीय सामना शनिवारी 11 जानेवारीला खेळवण्यात येणार आहे.

न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका तिसरा एकदिवसीय सामना कुठे?

न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका तिसरा एकदिवसीय सामना इडन पार्क, ऑकलंड येथे होणार आहे.

न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका तिसऱ्या एकदिवसीय सामन्याला किती वाजता सुरुवात होईल?

न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका तिसऱ्या एकदिवसीय सामन्याला भारतीय वेळेनुसार सकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 6 वाजता टॉस होईल.

न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका तिसरा एकदिवसीय सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका तिसरा एकदिवसीय सामना टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.

न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका तिसरा एकदिवसीय सामना मोबाईलवर कुठे पाहता येईल?

न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका तिसरा एकदिवसीय सामना मोबाईलवर सोनी लिव्ह एपवर पाहायला मिळेल.

न्यूझीलंड क्रिकेट टीम : मिशेल सँटनर (कॅप्टन), विल यंग, ​​रचीन रवींद्र, मार्क चॅपमन, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, नॅथन स्मिथ, मॅट हेन्री, जेकब डफी, विल्यम ओरोरके, मिचेल हे आणि मायकेल ब्रेसवेल.

श्रीलंका क्रिकेट टीम : चरिथ असलंका (कर्णधार), पाथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस (विकेटकीपर), कामिंदू मेंडिस, जेनिथ लियानागे, चामिंडू विक्रमसिंघे, वानिंदू हसरंगा, महेश थेक्षाना, एशान मलिंगा, असिथा फर्नांडो, नुवानिद फर्नांडो, निवानिद फर्नांडो, नुवानिद फर्नांडो वेललागे, मोहम्मद शिराझ, लाहिरू कुमारा आणि जेफ्री वँडरसे.