श्रीलंका क्रिकेट टीम सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. यजमान न्यूझीलंडने टी 20i मालिकेत 2-1 ने विजय मिळवला. तर श्रीलंकेने तिसरा आणि अंतिम सामना जिंकत लाज राखली. त्यानंतर आता उभयसंघात 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर दोन्ही संघांसाठी ही मालिका फार महत्त्वाची आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी ही सीरिज रंगीत तालीम आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना कुठे आणि केव्हा होणार? याबाबत जाणून घेऊयात.
न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका पहिला एकदिवसीय सामना रविवारी 5 जानेवारीला होणार आहे.
न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका पहिला एकदिवसीय सामना बेसिन रिझर्व्ह वेलिंग्टन येथे होणार आहे.
न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका पहिल्या एकदिवसीय सामन्याला भारतीय वेळेनुसार पहाटे 3 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 3 वाजता टॉस होईल.
न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका पहिला एकदिवसीय सामना मोबाईलवर सोनी लिव्ह एपवर पाहता येईल.
न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका पहिला एकदिवसीय सामना टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहता येईल.
रविवारपासून वनडे सीरिजचा थरार
Among the gallery of greats!
The two captains getting set for ODI cricket with a visit to the NZC Hall of Fame at the @NZCricketMuseum. The Chemist Warehouse ODI series against Sri Lanka starts tomorrow at the @BasinReserve 🏏 #NZvSL #CricketNation pic.twitter.com/8FclEqICON
— BLACKCAPS (@BLACKCAPS) January 4, 2025
वनडे सीरिजसाठी न्यूझीलंड टीम : मिशेल सँटनर (कॅप्टन), विल यंग, रचीन रवींद्र, टॉम लॅथम (विकेटकीपर), डॅरिल मिशेल, मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मॅट हेन्री, जेकब डफी, विल्यम ओरोरके, मिचेल हे आणि नॅथन स्मिथ.
वनडे सीरिजसाठी श्रीलंका टीम : चरिथ असलंका(कॅप्टन), पाथुम निसांका, निशान मदुष्का(विकेटकीपर), अविष्का फर्नांडो, नुवानिडू फर्नांडो, जेनिथ लियानागे, वानिंदू हसरंगा, चामिंडू विक्रमसिंघे, महीश तीक्षना, जेफ्री वांडरसे, लाहिरू कुमारा, अशिथा फर्नांडो, कुसल मेंडिस, दुनिथ वेललागे, मोहम्मद शिराज आणि एशान मलिंगा.