वनडे कपमध्ये वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचे 8 फलंदाज फक्त 1 धावावर तंबूत, तास्मानियाने सामना जिंकला

| Updated on: Oct 25, 2024 | 3:34 PM

ऑस्ट्रेलियात वनडे कप स्पर्धा सुरू असून वेस्ट ऑस्ट्रेलिया आणि तस्मानिया हे संघ आमनेसामने आले होते. हा सामना तास्मानियाने 7 विकेट राखून जिंकला. या सामन्यात वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचे 8 विकेट अवघ्या एका धावेवर पडले.

वनडे कपमध्ये वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचे 8 फलंदाज फक्त 1 धावावर तंबूत, तास्मानियाने सामना जिंकला
Follow us on

ऑस्ट्रेलियात देशांतर्गत वनडे कप स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेतील दहाव्या सामन्यात वेस्टर्न ऑस्ट्रेलिया आणि तास्मानिया हे संघ आमनेसामने आले होते. हा सामना तास्मानियाने 7 गडी राखून जिंकला. नाणेफेकीचा कौल तास्मानियाच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी आलेल्या वेस्टर्न ऑस्ट्रेलिया संघाने सावध सुरुवात केली. पण त्यानंतर डाव गडगडला आणि संपूर्ण संघ फक्त 20.1 षटकं खेळत 53 धावांवर बाद झाला. हे आव्हान तास्मानियाने फक्त 3 गडी गमवून 8.3 षटकात पूर्ण केलं. वेस्ट ऑस्ट्रेलियाकडून ॲरॉन हार्डी आणि डार्सी शॉर्ट यांनी पहिल्या विकेटसाठी 11 धावांची भागीदारी केली. यानंतर कॅमेरून बॅनक्रॉफ्ट आणि शॉर्टने दुसऱ्या विकेटसाठी 33 धावांची भागीदारी केली. सर्वात आधी ॲरॉन हार्डी 7 धावा करून बाद झाला. त्यानंतर शॉर्टची विकेट 22 धावांवर पडली. 44 धावांपुढे खेळताना जोश इंग्लिससोबत बॅनक्रॉफ्टने 9 धावांची भागीदारी केली आणि संघाची धावसंख्या 53 असताना बाद झाला. जोश इंग्लिसने 1 धाव करून बाद झाला. संघाची धावसंख्या 53वर कशीबशी पोहोचल्यानंतर विकेटची जी रांग लागली ती शेवटपर्यंत..अवघ्या एका धावेवर 8 विकेट तंबूत गेले.

कर्णधार ॲश्टन टर्नर, कूपर कॉनोली, हिल्टन कार्टराईट, ॲश अगर, जे. रिचर्डसन, जोएल पॅरिस आणि लान्स मॉरिस (नाबाद) खाते उघडण्यात अपयशी ठरले. तास्मानियाकडून गोलंदाजीत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ब्यू वेबस्टरने 17 धावा 6 विकेट घेतल्या. तर बिली स्टॅनलेकने 3 विकेट, तर एक विकेट टॉम रॉजर्सच्या वाट्याला गेली. एका धावेवर 8 विकेट गेल्या असल्या तरी एकही गोलंदाजाला हॅटट्रीक काही घेता आली नाही. विशेष म्हणजे सहा खेळाडूंना आपलं खातंही खोलता आलं नाही. विजयासाठी दिलेल्या 53 धावांचा पाठलाग करताना तास्मानियन संघाने 3 गडी गमावले. पण 8.3 षटकात दिलेले लक्ष्य पूर्ण केलं.मिचेल ओवेनने 29 धावांची खेळी केली, तर मॅथ्यू वेडने नाबाद 21 धावा केल्या.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

तास्मानिया (प्लेइंग इलेव्हन): मिचेल ओवेन, कॅलेब ज्युवेल, जेक वेदरल्ड, जॉर्डन सिल्क (कर्णधार), मॅथ्यू वेड, ब्यू वेबस्टर, जेक डोरन (विकेटकीपर), ब्रॅडली होप, टॉम रॉजर्स, मॅथ्यू कुहनेमन, बिली स्टॅनलेक.

वेस्टर्न ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): डी आर्सी शॉर्ट, ॲरॉन हार्डी, कॅमेरॉन बॅनक्रॉफ्ट, जोश इंग्लिस (विकेटकीपर), ॲश्टन टर्नर (कर्णधार), कूपर कॉनोली, हिल्टन कार्टराईट, ॲश्टन आगर, झाय रिचर्डसन, जोएल पॅरिस, लान्स मॉरिस.