मुंबई | आयसीसी अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने काही दिवसांआधी भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेसाठी वेळापत्रक जाहीर केलं. त्यानुसार 5 ऑक्टोबरपासून स्पर्धेला सुरुवात होणार आहे. तर महाअंतिम सामना हा 19 नोव्हेंबरला पार पडणार आहे. सलामीचा आणि शेवटचा सामना हा अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. तर टीम इंडिया 8 ऑक्टोबर रोजी आपला पहिला सामना खेळणार आहे.
टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यातून वर्ल्ड कप मोहिमेला सुरुवात करणार आहे. वर्ल्ड कप वेळापत्रकानंतर आता क्रिकेट चाहत्यांना टीम इंडियाची घोषणा केव्हा होणार याकडे लागलंय. आयसीसीनुसार, स्पर्धेच्या एक महिन्याआधी प्रत्येक क्रिकेट बोर्डला आपल्या संघ जाहीर करायचाय. त्यानुसार 5 सप्टेंबरपर्यंत टीम इंडियाची घोषणा होणार असल्याचं अपेक्षित आहे.
बीसीसीआयने आगामी एशियन गेम्स स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड केली. त्यामुळे निवड न झालेल्या खेळाडूंचीच वर्ल्ड कपमध्ये संधी मिळेल, हे निश्चित झालंय. तर दुसऱ्या बाजूला टीम इंडियाचा माजी फलंदाज वसीम जाफर याने वर्ल्ड कपसाठी आपली टीम निवडली आहे. वसीम जाफरने जिओ सिनेमावर एका चर्चेदरम्यान आपला संघ जाहीर केला.
वसीम जाफर याने रोहित शर्मा याला कॅप्टन केलंय. तर वसीम जाफरने ओपनर म्हणून तिघांना संधी दिली आहे. यामध्ये शुबमन गिल, रोहित शर्मा आणि शुबमन गिल या तिघांचा समावेश आहे.
“माझ्या टीममध्ये 3 ओपनर आहेत. शिखर धवन याची निवड करण्यात आली नाही तरीही तो माझ्या टीममध्ये बॅकअप ओपनर म्हणून आहे. वनडाऊन म्हणून विराट कोहली खेळेल. चौथ्या आणि महत्वाच्या स्थानी श्रेयस अय्यर असेल. पाचव्या स्थानी केएल राहुल तर सहाव्या क्रमांकावर हार्दिक पंड्या उतरेल. यानंतर 3 फिरकी गोलंदाज म्हणून रविंद्र जडेजा, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव या तिघांचा समावेश आहे”, असं जाफर म्हणाला.
माझ्या प्लेइंग इलेव्हन टीममध्ये जसप्रीत बुमराह असेल. तर मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज या दोघांपैकी कुणी एक असेल. वर्ल्ड कप भारतात होत असल्याने हार्दिकने बॉलिंग करणं माझ्यासाठी महत्वाचं आहे. हार्दिकने 7-8 ओव्हर बॉलिंग केली तरी माझ्यासाठी खूप आहे. हार्दिकने बॉलिंग टाकली तर 3 फिरकी बॉलर्सना खेळवू शकतो”,असंही वसीम जाफरने सांगितलं. तसेच शार्दुल ठाकूर आणि संजू सॅमसन या दोघांची राखीव खेळाडू म्हणून टीममध्ये निवड करण्यात आली आहे.
रोहित शर्मा (कॅप्टन), शिखर धवन, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.
राखीव खेळाडू | संजू सॅमसन आणि शार्दुल ठाकुर.