मुंबई : यंदाच्या वर्षी वनडे वर्ल्ड कप 2023चा थरार रंगणार असून तब्बल 12 वर्षांनी भारतामध्ये होणार आहे. टीम इंडिया यंदाच्या वर्ल्ड कपची प्रबळ दावेदार मानली जात आहे. टीम इंडियाचे घरच्या मैदानावर सामने असल्याने त्याचा निश्चितच संघाला फायदा होणार आहे. टीम इंडियासाठी एक आनंंदाची आहे. स्टार खेळाडू जसप्रीत बुमराहसंदर्भात एक अपडेट समोर आली आहे.
मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात ऑस्ट्रेलिया विरुध्दच्या टी-20 सामन्यात बुमराह खेळला होता. त्यानंतर तो खेळलाच नाही. पाठीच्या दुखापतीमुळे सध्या तो टीमच्या बाहेर आहे. दुखापतीमुळे बुमराहने मार्च महिन्यात न्यूझीलंड येथे सर्जरी केली होती. मात्र बुमराहने नॅशनल क्रिकेट अॅकॅडमी (NCA) येथे नेटमध्ये सराव सुरू केली आहे. यादरम्यान त्याने 7 ओव्हर गोलंदाजी केली मात्र तरीसुद्धा तो खेळणार नाही याबाबत साशंकता आहे.
बुमराहची पाठदुखी टीम इंडियासाठी फार मोठी डोकेदुखी ठरत आहे. आयर्लंडविरुध्द होणाऱ्या टी-20 सामन्यासाठी बुमराह फिट असेल तर त्याला आशिया कपमध्ये खेळण्याची संधी मिळणार असल्याची माहिती समजत आहे.
टीम इंडियाचे माजी फिटनेस कोच रामजी श्रीनिवासन यांनी बुमहारबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. बुमराहच्या कमबॅकची घाई न करण्याचा सल्ला श्रीनिवासन यांनी दिला आहे. NCA मध्ये बुमराह सराव सामने खेळत आहे. त्याच्या पुनरागमनसाठी फायद्याचं ठरू शकत असल्याचं श्रीनिवासन म्हणाले.
दरम्यान, आयसीसीने मंगळवारी यंदाच्या वनडे वर्ल्ड कपचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. टीम इंडियाचे होणारे सामने खालीलप्रमाणे :
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया – 8 ऑक्टोबर, चेन्नई.
टीम इंडिया विरुद्ध अफगानिस्तान – 11 ऑक्टोबर, दिल्ली.
टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान – 15 ऑक्टोबर, अहमदाबाद
टीम इंडिया विरुद्ध बांग्लादेश – 19 ऑक्टोबर, पुणे.
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड – 22 ऑक्टोबर, धर्मशाळा.
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड – 29 ऑक्टोबर, लखनऊ.
टीम इंडिया विरुद्ध क्वालीफायर – 2 नोव्हेंबर, मुंबई.
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण अफ्रीका – 5 नोव्हेंबर, कोलकाता.
टीम इंडिया विरुद्ध क्वालीफायर – 11 नोव्हेंबर, बंगळुरु.