मुंबई : वर्ल्ड कप 2023 मध्ये दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या सामन्यात आफ्रिकेच्या संघाने मोठा विजय मिळवला आहे. प्रथम फलंदाजी करताना 399-7 धावांचा भलामोठा डोंगर उभारला होता. क्लासेन याचं ‘क्लास’ शतक आणि मार्को यान्सेन याच्या आक्रमक अर्धशतकी खेळीने भलामोठा धावांचा डोंगर उभारता आला. या लक्ष्याचा पाठालाग करताना वर्ल्ड कप विजेत्या संघाचा डाव 170 धावांवर आटोपला. आफ्रिकेने तब्बल 229 धावांनी विजय मिळवला. या मानहानिकारक पराभवावर कर्णधार जोस बटलर याने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
टॉस जिंकल्यावर आम्ही पहिल्यांदा बॅटींग करण्याचा निर्णय घ्यायला हवा होता. हा पराभव आमच्यासाठी निराशाजनक असून आम्ही नियोजनानुसार खेळू शकलो नाही. संघात आम्ही तीन बदल केले होते मात्र हा काही मोठा विषय नाही. आमची बॉलिंग फार काही चांगली झाली नाही. आफ्रिकेला आम्ही 340-350 धावांच्या आसपास रोखलं असतं तर बरं झालं असतं, असं जोस बटरल म्हणाला.
जर आमची चांगली सुरूवात झाली असती तर टार्गेटचा पाठलाग करणं सोप गेलं असतं. आमच्यासाठी उष्णता मोठं आव्हान होतं, आता उपांत्य फेरी गाठण्यासाठी सर्व सामने जिंकावे लागणार असल्याचं बटलरने सांगितंल. एकंदरित बटलरने, सर्वच गोलंदाज आणि सुरूवातीच्या फलंदाजांना दोषी मानल आहे.
इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | जोस बटलर (कॅप्टन आणि विकेटकीपर), जॉनी बेअरस्टो, डेविड मलान, जो रूट, बेन स्टोक्स, हॅरी ब्रूक, डेव्हिड विली, आदिल रशीद, गस ऍटकिन्सन, मार्क वुड आणि रीस टोपले.
दक्षिण आफ्रिका प्लेईंग ईलेव्हन | एडन मारक्रम (कॅप्टन), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रीझा हेंड्रिक्स, रॅसी व्हॅन डर डुसेन, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅनसेन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज, कागिसो रबाडा आणि लुंगी एनगिडी.